मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील जि.प.हा.शाळेत क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी.
मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील जि. प. हा.शाळेत दि.३ जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन मोठ्या थाटामटात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस शाळेचे मुख्याध्यापक श्री बहिरवाड सर व पत्रकार भारत सोनकांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्त्री शिक्षणाच्या गंगोत्री,सावित्रीबाई फुले,स्त्री शिक्षणाच्या प्रसारासह विधवा पुनर्विवाह,सती प्रथा बंदीसाठी कार्य करणाऱ्या महान समाज सुधारक,कवयित्री,पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.!! समाजोन्नतीसाठी व प्रामुख्याने महिलांना न्याय , सन्मान मिळवून देण्यासाठी माता सावित्री फुलेंचा अद्वितीय त्याग , संघर्ष व अतुलनीय कार्य आता जवळपास सर्व शिकल्या - सवरल्या लोकांना माहित आहे . त्यांच्या त्यागमय कार्यामुळे मुली आज सन्मानाने शिक्षण घेत आहेत . अनेक महिलांनी आज विविध क्षेत्र काबीज केली आहेत त्याचे श्रेय केवळ सावित्रीमाई फुलेंनाच जाते . पण अजूनही ग्रामीण भागात हवी तशी जागृती झाली नाही . सावित्री माईचे चे अधूरे राहिलेले कार्य वेगवेगळ्या पदावर असलेल्या महिलांनी पुढे न्यायला हवे , आणि ते नेतीलही असा आशावाद निर्भीड व धाडसी पत्रकार,तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मुखेड चे तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे यांनी सावित्रीच्या लेकी शिकून मोठ्या झाल्यावर ह्या मातेचे कार्य पुढे नेतील असा भावउद्गार यावेळी काढले .
यावेळी कु.पूजा दीपक सोनकांबळे या बलिकेसह अनेक मुलींनी सावित्रबार्इं फुले यांच्या जीवकार्यावर प्रकाश टाकला.
बेटमोगरा येथील जि.प.हा. शाळेच्या वतीने सावित्रीमाई फुलेंची १८९ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रबाई फुले यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मुलींनी सावित्रीमाई फुले यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे असे शाळेचे मुख्याध्यापक श्री बाहिरवाड सर यांनी यावेळी अध्क्षस्थानावरून पदावरुन बोलताना म्हणाले . ह्या प्रसंगी ६ वी , ७ वी च्या विद्यार्थिनींनी सावित्रीमाई फुलेंचा वेष धारण केला होता .
श्री. गायकवाड सर ह्यांनी सावित्रीमाई फुलेंच्या कार्यकर्तृत्वाचे अनेक पैलू सांगून आज विविध क्षेत्रात महिला उच्च पदावर आहेत त्या केवळ सावित्रीमातेच्या त्याग, संघर्ष व कार्यामुळेच असे प्रतीपादन केले .
श्री. आंबेकर सर यांनी कर्मठांनी धर्माच्या नावावर फुले दांपत्याचा केलेला छळ ,सावित्रीमाईंनी लिहीलेली काव्यपुस्तके , केशवपण विरूध्द लढलेला लढा , अस्पृष्यतेविरूध्द लढलेला लढा , सहकारी शेख फातिमा यांचे शैक्षणिक सहकार्य , शेख मियाँ शे . उस्मान यांनी फुले दांपत्यास केलेली मदत , फुलेंची विद्यार्थिनी मुक्ता साळवे हीची चिकित्सक बुध्दी , विधवांना दिलेला आश्रय , सत्यशोधक समाज चळवळीतून केलेले कार्य,प्लेगच्या साथीत माईंनी धोका पत्करुन लोकांचे वाचविलेले प्राण इ . बाबीवर भाष्य केले .
प्रास्ताविक श्री.आंबेकर सर तर यशस्वीपणे आयोजन मुख्याध्यापक श्री.बाहिरवाड सर, श्री.स्वामी सर, श्री.बेजगमवार सर, श्री. गायकवाड सर, सौ.माळगे मॅडम, श्री. राठोड सर, पवार सर, बोंतपल्ले सर, सेवक मौला मामा शेख व कानगुले यांनी केले .
सुत्रसंचालन कु . तन्वी बाऱ्हाळे तर आभार प्रदर्शन कु . अनुष्का भोसले या विद्यार्थिनींनी केले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा