कुंडलवाडी - शहरातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे ईदगाह,शादीखाना बांधकामसाठी खासदार निधी देवून विकास कामे करण्यात यावे.जिल्हा परिषद हायस्कूल उर्दू माध्यमात नववी व दहावी वर्गास शासनातर्फे मान्यता मिळवून द्यावे.या बाबत जिल्हा परिषद सदस्य तथा नियोजन समितीचे सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाचे लाडके खासदार मा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची भेट घेवून निवेदन दिले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून येथील अल्पसंख्याक मुस्लिम समाज बांधवांचा प्रत्येक निवडणुकीत विविध पक्षातील लोकप्रतिनिधी ओट बॅक म्हणून वापर करून घेतले.शादीखाना बांधण्यात येईल,मुस्लिम ईदगाहाचा,
आशुरखान्याचा, मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचा प्रभागाचा विकास करण्यात येईल अशी आश्वासनाची खैरात देण्यात आले.पण विकास मात्र करण्यात आले नाही.
त्या अनुषंगाने दि.5 जानेवारी रोजी जिल्हा परिषद सदस्य तथा नियोजन समितीचे सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड व मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मोहम्मद अफजल यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाचे लाडके खासदार मा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवास्थानी त्यांची भेट घेवून निवेदन दिले.यात मुस्लिम शादीखाना बांधण्यासाठी,मुस्लिम ईदगाह येथील अंतर्गत रस्ते,उत्तर व दक्षिण बाजूचे संरक्षण भित,इंधन विहीर आदी विकासकामे खासदार निधीतून करण्यात यावे.तसेच शहरातील प्रथम ज्ञान मंदीर जिल्हा परिषद हायस्कूल येथे उर्दू नववी व दहावी वर्गास शासनातर्फे मान्यता मिळवून द्यावे.शहरातील मुस्लिम बगूल प्रभागत उर्दू अंगणवाड्या सुरू करण्यात सबंधीतांना आदेशीत करावे अशी मागणी करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा