बिलोलीःप्रतिनिधी
येथील मराठवाडा बहुभाषीक पत्रकार संघाच्या वतीने दि.७ जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे मराटी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पन दिनाचे औचित्य साधुन पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांचा हस्ते दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले व जेष्ठ पत्रकार ए. जी.क़ुरैशी यांच्या विशेष सन्मान करण्यात आला.
मराटी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पन च्या रुपान पहिल मराठी वृत्तपत्र महाराष्ट्रात सुरु झाल दर्पन या वृत्तपत्राच पहिल अंक ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशीत झाल. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म देखील ६ जानेवारी १८१२ रोजी झाला याच योगायोगाने बाळशास्त्रीचां जन्मदिवस त्यांच्या स्मृत्यर्थ हाच दिवस पत्रकार दिन म्हणुन ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात साजरा केला जातो.
या अभिवादन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहिलेले येथील पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे साहेब यानीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेल्या कार्याचा इतिहास सांगतांना ते म्हणाले महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजीक परिवर्तनासाठी जांभेकरांनी पत्रकारीतेचा वापर केला त्याच बरोबर जातीभेद निर्मुलन आणि विधवा पुनर्विवाह सती प्रथा बंदी या बाबींना ते आपल्या दर्पन च्या माध्यमातुन जन माणसा पर्यंत पोहचविण्याच काम केल त्याच प्रमाणे आताच्या पत्रकार बांधवांनी समाजाच्या हितासाठी सकारात्मक पत्रकारीता करावी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातुन सर्वसामाण्याचे प्रश्न सोडविण्याचे काम करुन समाजापुढे या दिनाचा आदर्श कायम टिकुण ठेवावा आसे यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले.
या पत्रकार दिनी येथील जेष्ठ पत्रकार ए.जी.कुरेशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला या प्रसंगी जेष्ठ पत्रकार प्रकाश पोवाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले बहुभाषीक पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख फारुख यांनी अध्यक्षीय समारोप केला तर सूत्रसंचालन बालाजी नरहरे केले तर संघाचे सचिव सतीश बळवंतकर यांनी आभार मानले या वेळी बहुभाषीक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शेख युनुस, माधव एडके,सुनील कदम,पत्रकार माजीद सर, शेख नवाब, सय्यद रियाज मार्तंड जेठे ,माधव दंतापल्ले,साईनाथ शिरोळे, शुभम निदाने आदि या वेळी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा