बिलोली (प्रतिनिधी )
गत सप्टेंबर-आक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्या नंतर शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने सरसकट नुकसान पिकाचे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्वे करण्यात यावे व त्या बाबतचा अहवाल शासनास सादर करावा असे निर्देश असतांना तालुक्यात सर्वे करणाऱ्या यंत्रणेतील कांही अधिकारी व कर्मचारी बांधावर जाऊन सर्वे करण्या ऐवजी खुर्चीवर बसून सर्वे केल्यामुळे कांही गावातील पिक लागवडी जमिनीचे क्षेत्र कमी दाखवून पिकांच्या सर्वेचा चुकीचा अहवाल शासनास सादर केला. यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला असून या बाबतची चौकशी तात्काळ करण्यात येऊन सबंधीतावर कार्यवाही करण्यात यावी.तसेच सन 2018-19 मधील प्रलंबित दुष्काळी अनुदानाचे शेतक-यांना वाटप करावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघटनेचे राज्य सरचिटणीस राजु पाटील शिंपाळकर यांच्यासह कांही शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, उपजिल्हाधिकारी व तहसिलदार बिलोली,कृषी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच मागणी केली आहे.
गेल्या सप्टेंबर - आक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर नुकसानीसाठी शासनाकडुन हेक्टरी आठ हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेनुसार अनुदान जाहीर करण्यात आले.तसा शासनाकडे नुकसानग्रस्त शेती पिकाचा अहवाल देखील पाठवण्यात आला पण सदर नुकसानग्रस्त पिकाचे सर्वेक्षण करत आसताना कांही तलाठी व कृषि सहाय्यक थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकाचे सर्वेक्षण करुन तसा संयुक्त अव्हाल सादर करणे अपेक्षित होते.पण या सर्व बाबी बाजुला सारीत शेतक-यांच्या नावे आसलेल्या एकंदरीत पिक लागवडीच्या क्षेत्रापैकी शेतक-यांना मिळणाऱ्या दोन हेक्टर मर्यादेनुसार अनुदानीत लाभातुन सरळ- सरळ ३० ते ३५ टक्के क्षेत्र कमी करुन तसा अहवाल प्रशासनाकडे सादर केला.त्यामुळे तालुक्यातील हजारो शेतक-यांवर अन्याय झाला असून बांधावर न जाता घरबसल्या सरसकट चुकीची टक्केवारी दाखवून शेतक-यांवर अन्याय करण्यात आला असा दि.०७ जानेवारी रोजी संबधीताना दिलेल्या निवेदनात आरोप करण्यात आला आहे. चुकीचा आवहाल सादर करणाऱ्यावर योग्य ती कार्यवाही व अन्यायग्रस्त शेतक-यांना न्याय द्यावा अन्याथा अदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. सदर निवेदनावर राजु पाटील शिंपाळकर बालाजी पाटील रामपुरकर ,दत्ताञ्ये माडे केसराळीकर,शांतेश्वर पाटील काळे,शेख इब्राहिम ,सुभाष पाटील काळे,बाबुराव नाइक,कपिल नाइक आदिच्या सह्या आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा