कंधार(प्रतिनिधी)
मुस्लिम बांधवांचे सण म्हणजे ईद उल फितर हा आनंदाने साजरा करणारा सण आहे. एकमेकांमधे बंधुभावाचे नाते स्थापीत व्हावे आणि प्रेमाने आनंदाने साजरा होणारा असा हा उत्सव आहे. पण सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे, राज्यात व जिल्ह्यात कोरोनाह बधितांची संख्या वाढत आहे, त्यामुळे देशात लॉकडाउनचा कालावधी ही वाढत आहे, मुस्लिम समुदायाचा पवित्र रमजान महिना या लॉकडाउन मध्येच आल्याने, रमजान ईद निमित्त मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात कपडे, नवीन वस्तु खरेदी करतात. त्यामुळे कंधार तालुक्यातील बारुळ येथील सामाजिक कार्यकर्ते शेख आलीसाहेब यांनी मुस्लिम समाजातील नागरिकांना आवाहन करत सांगितले की, सध्या देशात लॉकडाउन आहे, नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधितांचीसंख्या वाढत आहे, त्यासाठी मुस्लिम समुदाय खरेदीसाठी कुठेही बाहेर पडुनये, रमजान ईद आपल्या घरीच साजरी करावी, मुस्लिम बांधव ईदगाह वा मशिदीत नमाज अदा न करता एकत्रीत येऊनये. एकमेकांना आलिंगन शुभेच्छा देऊनये. शासनाने ठरून दिलेले नियमाचे पालन करावे, ईद च्या दिवशी तळागाळातील व्यक्ती देखील या सणापासुन वंचीत राहु नये म्हणुन त्याला मदत करण्यास समोर यावे. तोंडाला मास्क बांधावे, सनेटाईजर चा वापर करावा, वेळोवेळी साबणाने हात धुवावे, घरी रहावे सुरक्षित रहावे.
खऱ्या अर्थाने कोरोना महामारीवर मात केल्यावर खरी ईद साजरी करावे. मोहम्मद पैगंबरांनी आपल्या जीवनकाळात संपुर्ण मानवजातीला विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. सामाजिक न्याय, समता, उदारता, समरसता याचे महत्व विशद केले आणि संपुर्ण मानवजातीच्या कल्याणाकरता आपले आयुष्य वाहुन घेतले. महम्मद पैगंबरांनीही अशा महामारीवर मात करण्यासाठी त्यांच्या काळत पण घरीच राहण्याचे सांगितले होते.
मोहम्मद पैगंबरांनी शिकवण एका विशिष्ट जातीधर्मापुरती मर्यादीत नव्हती तर समस्त विश्वाचे कल्याण व्हावे असे त्यांच्या शिकवणीतुन प्रदर्शित होते. असा संदेश बारुळचे सामाजिक कार्यकर्ते शेख अलीसाहेब यांनी समस्त मुस्लिम समुदायास दिले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा