रयत क्रांती संघटना वतीने 15 मे रोजी आंदोलन
कोरोना व्हायरसच्या महामारी ने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन सरकारने जाहीर केले. या काळात सर्वात जास्त नुकसान जगाचा पोशिंदा असणारा शेतकऱ्यांचे झाले आहे,पण सरकार शेतकऱ्याकडे या काळात लक्ष देत नाही, सरकारला वाटते कोरोणा हे एकमेव संकट आहे बाकी राज्यांमध्ये आता दुसरे कोणतेही संकट नाही,अशा पद्धतीने सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सरकारचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ. सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात माझे अंगण माझे आंदोलन दि.१५ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर शेतकरीपुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केले आहे.
हे आंदोलन आपल्या अंगणात, शेतात हातात आपल्या मागण्या चे पोस्टर घेऊन, लॉक डाऊनलोड सर्व नियम पाळून करावे. तोंडावर मास्क, शारीरिक आंतर ठेवून आंदोलन करावे.
खालील मागण्या:-
- रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून राज्यभर हे आंदोलन करण्यात येणार आहे. अंगण हेच माझे आंदोलन अशा स्वरूपाचे हे आंदोलन असून
- शेतकऱ्यांचा साता बारा कोरा करावा
- आधारभूत किंमतीने शेती माल खरेदी करावे किंवा प्रति क्विंटल 1 हजार या अनुदान देण्यात यावे ( सरसकट कापूस खरेदी करावा),
- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी देण्यात यावी
- दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान द्यावे
- कोरोनामुळं फुले, फळ-भाजीपाल्याचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी
- खरीब हंगामासाठी बी-बियाणे, खते अनुदान स्वरूपात द्यावे व पीक कर्ज उपलब्ध करून घ्यावे त्याच बरोबर
- रेशनकार्ड नसणाऱ्या कामगार, शेत मजुरांना मोफत धान्य आणि 2 हजार रुपये भत्ता देण्यात यावा
- शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी
- अशा प्रमुख मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा