१२ मे २०२०

गंगाबेट परिसरात वादळी वाऱ्या मुळे केळी झाली भुईसपाट



⏩आमदार मोहन आण्णा हंबर्डे यांच्याकडून पाहणी

शिराढोण :- (शुभम डांगे)
नांदेड तालुक्यातील गंगाबेट येथील केळी उत्पादक शेतकरी शिवाजी सोनटक्के यांच्या शेतातील केळी वादळी वाऱ्यात भुईसपाट झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाजी सोनटक्के यांनी दुष्काळावर मात करून केळीचे पिक जोमात आणले होते. केळीच्या झाडांना चांगले फळही लागले होते. त्याची विक्री दहा ते पंधरा दिवसांत करण्यात येणार होती परंतु सरकारने घोषित केलेल्या लॉकडाउन मुळे सर्वत्र अडचण निर्माण झाली यातच रविवारी सकाळी पहाटेच्या सुमारास  वादळी वाऱ्यात 5 एकर क्षेत्रातील 3000 केळीची झाडे भूईसपाट झाली आहेत. गंगाबेट  परिसरासह  काही भागात रविवारी सकाळी मेघगर्जनेसह पाऊस व वादळी वारे झाले. यात गंगाबेट येथील शेतकरी शिवाजी सोनटक्के  यांच्या शेतातील केळीची पाच एकर बाग भुईसपाट झाली.आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या केळी उत्पादकांना रविवारी  पहाटे झालेल्या वादळ व पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. नांदेड  तालुक्यातील गंगाबेट  गावांतील केळी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.थंडी, उष्णतामान आणि पाणी कमी झाल्याने केळीच्या बागांचे आधीच ५० टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी बागा कापून टाकल्या आहेत. ज्या बागा शिल्लक होत्या त्यातील झाडे कमकुवत झाली होती. शनिवारी रात्री सहा ते आठ या वेळेत अचानक वादळासह पाऊस झाला. यात केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केळीची झाडे जमीनदोस्त झाली. पाने फाटून गेली. घडांचेही नुकसान झाले. या आपत्तीमुळे गंगाबेट  येथील शिवाजी सोनटक्के या केळी उत्पादकांचे किमान 7लाखा पेक्षा  अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गंगाबेट  गावांत केळीचे पीक सर्वाधिक घेतले जाते. मागील वर्षभरापासून हे केळी उत्पादक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. आधी थंडीमुळे बागांचे नुकसान झाले. त्यातून सावरत नाही तर उन्हाचा जोरदार तडाखा या बागांना बसला. सोबतच अनेक शेतकऱ्यांकडील नदीतील पाणी आटल्याने उभ्या बागा वाळल्या. यात ज्यांच्या बागा सुस्थितीत राहिल्या त्या शेतकऱ्यांना आता रविवार च्या  वादळाने मोठा फटका दिला. प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करण्यात आला .दक्षिण आमदार मोहन आण्णा हंबर्डे, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक जारीकोटे आदी उपस्थित होते.
 ________________________________

मी तीन हजार केळी रोपांची लागवड केली होती. आधी उष्णतेमुळे केळीचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून वाचलेली बाग रविवारी झालेल्या वादळात १०० टक्के उद्ध्वस्त झाली आहे. 
-शिवाजी सोनटक्के , केळी उत्पादक, गंगाबेट , जि.नांदेड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...