२९ जुलै २०२०

मिलिंद विद्यालयाची यशाची परंपरा कायम सेमी इंग्रजी चा निकाल 100 टक्के मुलीनी मारली बाजी

                   
कुंडलवाडी प्रतिनिधी (मोहम्मद अफजल)
येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद विद्यालयाची यशाची परंपरा कायम राखत यंदा इयत्ता दहावी सेमी इंग्रजी परीक्षेचा निकाल दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा 100 टक्के  लागला असून शाळेतून सर्वप्रथम कु. माहेश्वरी इरवंता चंदनकर (94.40), सर्व द्वितीय कु. प्रगती पांडुरंग होळकर (92.20), तर सर्व तृतीय  कु. शितल रंजीत चंदनकर (86. 80 )टक्के गुण प्राप्त केले आहेत. यंदा इयत्ता दहावी मराठी आणि सेमी विभागाचा निकाल एकत्रित  92.30 तर  सेमी चा निकाल 100 टक्के लागलेलाआहे. सदर परीक्षेत शाळेतून 130 पैकी 120 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात विशेष प्राविण्यासह 22 ,प्रथम श्रेणीत 34, द्वितीय श्रेणीत 42 तर 22  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .विशेष म्हणजे शाळेत सेमी इंग्रजी आल्यापासून 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखण्यात यश प्राप्त झाले आहे .या  सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर, शाळेचे मुख्याध्यापक यु.एस.राठोड व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...