कुंडलवाडी (मोहम्मद अफजल )
कुंडलवाडी परिसरात कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांचा संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसून येत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे.शासन कोरोनि साखळी तोडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असले तरी दि.29 आँगस्ट रोजी हुनगुंदा येथे अॅटिजन टेस्ट किटद्वारे 36 व्यक्तींची चाचणी करण्यात केली असता 13 जण कोरोना पाँझिटिव्ह आढळले होते.तसेच पिंपळगाव येथील अॅटिजन टेस्ट किटद्वारे 7 व्यक्तीचे चाचणी केली असता काल पाॅझिटिव्ह निघालेल्या त्या रूग्णाचे दोन नातेवाईक पाॅझिटिव्ह निघाले असल्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांनी दिली.
दि.29 रोजी घेण्यात आलेल्या अॅटिजन रॅपिड टेस्ट पथकात पथक प्रमुक कटके आर.एच, लाॅब टेक्निशीयन शेख वाय.वाय,शेख ए.ए,गौंड सी.जे,पवार के.एम,चालक संबेनवाड एम.ए आदींचा समावेश होता.
तर पिंपळगाव येथिल नागरीकांचे आरोग्य आबाधीत राहावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ.अश्वीनी लोखंडे रूग्ण राहात असलेला परिसर काॅन्टेमेन्टझून म्हणून जाहीर करून सिल करण्यात आले.नागरीकांचा रहदारीस बंदी घालण्यात आले.याकामी ग्रामसेवक,आरोग्य कर्मचारी पवळ,सौ गलाडे,आशा गटपर्यवेक्षक छायाबाई विभूते.व ग्रा.प.कार्यालय पिपळळगाव कर्मचारी सहकार्य करीत आहेत.तसेच हुंगुन्दा येथेसुद्धा वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ.चितळे श्वेता रूग्ण राहात असलेला परिसर काॅन्टेनमेन्ट झून म्हणून घोषीत करून सिल करून नागरीकांचा रहदारीस बंदी घालण्यात आले.याकामी ग्रामसेवक,आरोग्य कर्मचारी,हुंग्न्दा ग्रा.प.कार्यालय कर्मचारी सहकार्य करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा