कुंडलवाडी( मो.अफजल) प्रतिनिधी
शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे आरोग्य कर्मचारीसह शहलातील बाधीत रूग्ण राहात असलेल्या परिसरातील 69 नागरीकांचे अॅटिजन रॅपिड टेस्ट टिम आरोग्य तपासणी केली असता कुंडलवाडी शहरात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णात चारनी भर पडली तर परिसरात हुन्गुन्दा व पिंपळगाव येथील प्रत्येक गावातील एक प्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत काल साहा कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळले.तर कुंडलवाडी शहरातील पाॅझिटिव्ह संख्या बारावर पोहचली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे आरोग्य कर्मचारी यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने अधिकारी व कर्मचारी समाधान व्यक्त करीत आहेत.
दि.26 ऑगस्ट पासून शहरात पाॅझिटिव्ह रूग्ण संख्येत दिवसे दिवस भर पडत असून येथील भारतीय स्टेट बॅंकेतील चार पाॅझिटिव्ह कर्मचा-या पैकी एक रूग्ण शहरातील असून परत त्या रूग्णांचा कुटूबातील तीन व्यक्ती पाॅझिटिव्ह निघाले.त्यानंतर येथील आंबेडकर नगरीतील जेष्ठ नागरीक पाॅझिटिव्ह निघाले.काल परत शहरातील प्रभाग पाच मधील चार रूग्ण पाॅझिटिव्ह आढळले यातील एका महिला तेलंग्णा राज्यातील असल्याने त्या महिलेस तेलंगणा राज्यात रेफर करण्यात आले आहे. तर पिंपळगावातही कोरोनाने शिरकाव केले.येथील एक व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले.
सर्व पाॅझिटिव्ह रूग्ण कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहेत.अशी माहिती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांच्याकडून प्राप्त झाली.
घेण्यात आलेल्या अॅटिजन रॅपिड टेस्ट पथकात
अॅटिजन रॅपिड टेस्ट पथक प्रमुक कटके आर.एच, लाॅब टेक्निशीयन शेख वाय.वाय,शेख ए.ए,गौंड सी.जे,पवार के.एम,चालक संबेनवाड एम.ए आदींचा समावेश होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा