सगरोळी ता, ११ (बातमीदार) विज्ञानाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन संस्कृति संवर्धन मंडळ या संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी व शेतीचा दवाखाना म्हणून कार्य करीत आहे. मागील ६० वर्षापासून संस्था शिक्षणासह शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. समाजाकरिता काही करावयाचे असल्यास मोठा त्याग करावा लागतो. हा त्याग येथे दिसून येतो, थोडक्यात हि संस्था सावलीप्रमाणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. असे प्रतिपादन कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सगरोळी (ता.बिलोली) येथील संस्कृति संवर्धन मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवात जिल्हास्तरीय शेतकरी व महिला मेळाव्यात केले. यावेळी व्यासपीठावर आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख, विशेष कार्यअधिकारी मधु गिरगावकर, रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते पांडुरंग शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेश धुर्वे, कृषी सहआयुक्त तुकाराम जगताप, विभागीय कृषी अधिकारी माधव सोनटक्के, जिल्हा रेशीम अधिकारी पुंडलिक नरवाडे, तहसीलदार विक्रम राजपूत, कृषी विद्यापीठातील गृह विभागाचे प्राचार्य डॉ. हेमंगिनी सरंबेकर, रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
समाजाची सेवा करावयाची असेल तर त्या तळमळीची, त्या समाजात वावरलेली माणसं राजकारणात पाहिजेत, गावगड्यातील माणसे विधानसभेत येणे आवश्यक आहेत, तरच शेतकरी व मजुरांच्या व्यथा योग्य पद्धतीने सभागृहात मांडू शकतील. परंतु सध्याच्या राजकारणात तसे दिसून येत नसून केवळ घराणेशाही दिसून येते. ''आमचा नंबर लागल कव्वा, म्हसनवाट्यात जाईल तव्वा''.. अशी म्हणण्याची वेळ उच्च वर्णीय, घराणेशाहीच्या राजकारण्यांनी आणली आहे. . आम्ही विधानसभेत शेतकऱ्यांचे रखवालदार म्हणून काम करीत आहोत. या सरकारने शेतकऱ्यांसाठी चांगली कामे केली आहेत. मागील साडेतीन वर्षात 11 हजार कोटि रुपये पिक विमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. उद्या होणार्या मंत्री मंडळाच्या बैठकीत पेरणी ते कापणी यासाठी होणारा खर्च शेतकऱ्यांना देण्याबाबतचा निर्णयही घेतला जाणार आहे. वसंतदादा पाटलांच्या नंतर जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतीत, मातीत व नाल्यावर जाऊन काम करणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री असल्याचेही त्यांनी नमूद केले. या अर्थसंकल्पामध्ये सरकारने 500 रुपये महिना शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली परंतु यापुढे यापेक्षाही अधिक मदत शेतकऱ्यांना देऊ असे म्हणाले. तूर, हरबरा, ऑनलाईन खरेदी केली, बोंडअळीचे पैसे जमा केले तर हरबरा भावांतराचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत असेही सांगितले.
आमदार सुभाष साबणे यांनी येथील संस्था शेतकऱ्यांसाठी एकरूप होऊन काम करीत असल्याचे म्हणाले. संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी, शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते चळवळीतून उभे झाले त्यापैकी एक सदाभाऊ आहेत ते नक्कीच शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका व बियाणांचे वाटप करण्यात आले. महिला उद्योजक श्रीमती सीताबाई मोहिते व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. निरुपमा देशपांडे यांनी बचत गट व शेतकरी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या समारोपासाठी आज मंगळवार (ता.१२) रोजी शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे तथा पाशा पटेल हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा