बिलोली
जागतिक सुर्यनमस्कार दिन व रथसप्तमीचे औचित्य साधून मंगळवार दि.१२ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता बिलोली तालुक्यातील लघुळ येथील काळा मारोती मंदिर येथे मंदिर देवस्थान व आर्टस् आँफ लिव्हींग शाखा बिलोलीच्या संयुक्त विद्यमाने सामुहिक सुर्यनमस्कार व मारोती स्ञोञ पठनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव बाबाराव कोंडलवाडे गुरूजी यांची उपस्थिती राहणार आहे.गोविंद बसवंतराव मुंडकर यांचे विशेष असे मार्गदर्शन लाभनार आहे.तर अशोक पाटील ग्रा.पं सदस्य लघुळ,हणमंत बळके ग्रा.पं सदस्य लघुळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.हनुमान मंदिर देवस्थान समितीचे विनोद शामसुंदरराव इनामदार व आर्टस आँफ लिव्हींग बिलोली शाखेचे साईनाथ आरगुलवार यांच्या पुढाकारातुन होत असलेल्या या कार्यक्रमाची सुरूवात सामुहिक सुर्यनमस्काराने होणार आहे. सुर्यनमस्कारानंतर प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.तद्नंतर मारोती स्ञोञ पठन करण्यात येऊन मारोतीची आरती करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन मंदिर समिती व आर्टस आँफ लिव्हींग शाखा बिलोलीच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा