बिलोली
सुर्य नमस्कार करीत असताना सुर्याची किरणे अंगावर पडल्यामुळे वैज्ञानिक दृष्टीने व्यक्तीस मोठा फायदा होतोच.यासोबतच सुर्य ग्रहांची आराधना केल्यास वैयक्तिक लाभा बरोबरच विश्व कल्याणाची स्थिती निर्माण होते. सुर्याची आराधना व सुर्य नमस्कार करणाऱ्या व्यक्तीवर सुर्याचे तेज निर्माण होते. माणूस निरोगी व सकारात्मक राहतो.त्यामुळे सर्वांनी आपआपल्या परीने सुर्य नमस्कार व उपासना करणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन बिलोलीचे जेष्ठ पञकार गोविंद मुंडकर यांनी केले.
ते दि.१२ फेब्रुवारी रोजी बिलोली तालुक्यातील लघुळ येथील प्रसिध्द काळा मारोती मंदिर येथे मंदिर संस्थान व आर्ट आँफ लिव्हींग परिवार बिलोलीच्या वतीने रथसप्तमी व सुर्य नमस्कार दिनाचे औचित्य साधून सामूहिक सुर्य नमस्कार व हनुमान स्ञोतृ पठनाच्या आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक शंकरराव बाबाराव कोंडलवाडे गुरूजी यांची तर लघुळचे ग्राम पंचायत सदस्य अशोकराव पाटील,हनमंतराव बळके,मंदिराचे पुजारी शामराव इनामदार , गजानन महाजन,आर्ट आँफ लिव्हींग परिवाराचे साईनाथ आरगुलवार सावकार,वंशज पुजारी कुलदीपक इनामदार ,नागनाथराव इळेगावे ,प्रसाद कुलकर्णी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांसह नागरिकांनी सुर्य नमस्काराचे विविध प्रकार केले.तद्नंतर सामूहिक हनुमान स्ञोञाचे पठन करण्यात आल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाँल,श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.स्वागताच्या कार्यक्रमानंतर प्रमुख वक्ते मुंडकर यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी सुर्यनमस्काराविषयी मोलाचे असे मार्गदर्शन केले.व भगवान हनुमंताच्या महाआरती नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना मंदिराचे पुजारी कुलदीपक इनामदार यांनी संस्थानच्या वतीने वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची उपस्थितांना सविस्तर अशी माहीती दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा