डॉ.श्री.ज्ञानराज माणिकप्रभू महाराजांची उपस्थिती
बिलोली (सय्यद रियाज) सगरोळी येथील संस्कृति संवर्धन मंडळ या संस्थेला ६० वर्ष पूर्ण झाल्याने या संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षाचे उद्घाटन रविवार (ता.१०) रोजी डाॕ. श्री. ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांच्या यांच्या उपस्थिती संपन्न झाले व तीनदिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवास सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर सगरोळीच्या सरपंच सौ. सुजाताताई सिद्नोड, जि.प. सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, गणेश पाटील शिंपाळकर, पंचायत समितीचे उपसभापती दत्तराम बोधने, संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेश धुर्वे, भालचंद्र महाराज देगलूरकर, देविदास देशमुख, सुनील देशमुख, सौ. अरुणाताई देशमुख, संस्थेचे सचिव डाॕ.जयंत जकाते आदी मान्यवर उपस्थित होते.
हीरक महोत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी, मागील ६० वर्षाच्या काळातील संस्था कार्य आढावा घेत असून येथील जुन्या कार्यकर्त्यांनी कठीण परिस्थितीत अथक परिश्रम घेऊन संस्थेच्या उभारणीला बळ दिले असल्याचे आपल्या प्रास्ताविकेत म्हटले. नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेश धुर्वे यांनी, कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांना खूप मोलाचे योगदान होत आहे. शेतकऱ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा असे सांगितले. संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी, ६० वर्षांपूर्वी संस्था उभारणीत अनेकांनी सहकार्य केले. पुढील पिढीला शिक्षण मिळावे, त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण व्हावी या हेतूने सगरोळीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी बाबासाहेबांना तन, मन, धनाने सहकार्य केले म्हणूनच आज पर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले. कृषी विज्ञान केद्रामुळे संस्थेची व सगरोळीची आंतराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचे सांगितले.
सन १९५९ साली कर्मयोगी बाबासाहेबांनी आपण समाजाचे देणे लागतो. या उदात्त भावनेने संस्थेची स्थापना करून या परिसरातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आयुष्य व्यतीत केले असे आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.श्री. ज्ञानराज माणिकप्रभू महाराज म्हणाले. दुसऱ्या सत्रात पुणे येथील शेतीमाल निर्यात तज्ञ गोविंद हांडे यांनी, शेतीमाल निर्यातीची संधी व आव्हाने तर व्यावसायिक शेतकरी गुलाबराव पाटील यांनी व्यावसायीक शेती व गट शेती याविषयी मार्गदर्शन केले. या सर्व कार्यक्रमास विद्यार्थी, संस्था कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवात शेतकऱ्यांसाठी जवळपास पन्नासहून अधिक विविध कृषी कंपन्यांनी स्टॉल उभारली आहेत.
सुनील देशमुख यांचा षष्ट्यब्दीपुर्ती निमित्त सपत्नीक सत्कार
सगरोळीचे माजी उपसरपंच तथा संस्थेचे माजी संचालक श्री. सुनील यांनी नुकतीच ६० वर्ष पूर्ण केल्याने त्यांचा संस्था व कार्यकर्त्यांतर्फे श्रीजींच्या हस्ते गौरव करण्यात आला. सुनील देशमुख हे संस्था तथा सगरोळी गावाच्या माध्यमातून प्रभावी कार्य केले आहे. त्यांना ग्रामपालक असे संबोधले जाते. यावेळी जि. प. सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी सुनील देशमुख यांच्या कार्य व व्यक्तिमत्वाचा परिचय करून दिला.
फोटो ओळ: संस्कृति संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना मागील साठ वर्षातील कार्याचा मागोवा घेतला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा