पुणे संचालक कार्यालया येथे दि 22 फेब्रुवारी रोजी राज्यातील 14,440 प्रेरक बांधव आपल्या न्याय हक्कासाठी घेराव विराट मोर्चा बैठकीचे आयोजन वेळी
तालुक्यातील प्रेरक व प्रेरिका संघटनेच्या वतीने या बैठकीत 52 महिन्याच्या मानधन इतर प्रेरकांच्या मांगण्या संदर्भात दि 16 फेब्रुवारी रोजी गटसाधन केंद्र बि.ओ. अॉफिस प्रांगणात बैठक पार पडले.
ग्रामीण भागात अतिशय तुटपुंज्या मानधनावर अहोराञ काम करणाऱ्या प्रेरक - प्रेरिका तब्बल 52 महिण्याचे मानधन प्रलंबित असल्यामुळे प्रेरकांवरील अन्यायकारक धोरण अवलंबविलेल्या राज्य व केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणाविरोधात राज्यातील जवळपास 14,440 प्रेरक - प्रेरिकांचा मोर्चा पुणे येथे धडकणार असल्याचे प्रेरक संघटनेचे महाराष्ट्र राज्य निमंत्रक श्री दत्ता भैय्या देशमुख, जिल्हाध्यक्ष श्री माणिक कांबळे यांनी आव्हान केले. यावेळी
उपाध्यक्ष श्री मोहन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष
प्रसिद्धी प्रमुख श्री देविदास कोंडलाडे, श्री संदिप भुसावळे जिल्हा संघटक,श्री धोडिंबा कवळे उमरी ता. अध्यक्ष, सौ. गोदावरी राठोड महिला आघाडी उमरी, श्री सुधीर कोपुरवाड ता कार्यध्यक्ष, श्री अमोल नरहारे ता. सचिव, श्री विजय सिंदलोन ता. उपाध्यक्ष बिलोली, श्री बालाजी भालेराव, शेख जलील, श्री होनपारखे,गायकवाड तोरणेकर,कांबळे मँडम उपस्थित होत्या.सन 2012 पासुन साक्षर भारत योजनेअंतर्गत काम करणाऱ्या प्रेरकांवर भाजपा सरकारच्या कार्यकाळात अन्यायकारक धोरण अवलंबिल्यामुळे प्रेरकांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळलेली आहे. मार्च 2017 पासुन आदेश नाही,जवळपास प्रलंबित 52 महिन्याचे मानधन अध्यापर्यंत मिळालेले नाही, मानधनात वाढ नाही, असंख्य मांगण्यासह प्रेरकांना शासकियसह सेवेत सामावुन घ्या.सुप्रिम कोर्टाच्या निर्णायानुसार किमान 18000 हजार वेतन देण्यात यावे.यासह अनेक मागण्या आहेत. महाराष्ट्र राज्य बहुजन साक्षर भारत संघटनेच्या वतिने अनेक वेळा तहसिल,जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेवर, हिवाळी अधिवेशन नागपूर 4 वेळा, दिल्ली संसद भवन 4 वेळा वेळोवेळी उपोषण, आंदोलने करुनही गल्ली ते दिल्लीपर्यत सरकार कुंभकर्ण झोपेत असणाऱ्या भाजपा सरकारला अद्यापही जाग आलेली नाही. बहुसंख्य प्रेरक उच्चशिक्षित असुनही बेटी बचाव, स्वच्छ भारत, वृक्षारोपण, अनेक सामाजिक उपक्रमे पार पाडुन सुध्दा त्यांना ग्रामीण भागातील अनेक समस्या याबरोबरच भागातील अनेक मुलांबाळाचे शिक्षण अशा अनेक प्रश्नाच्या अन्यायाची धोरणाचा विरोधात प्रलबित असुन मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे आदरणीय मा. श्री भगवानरावजी देशमुख ( राज्य संघटक निमंत्रक महाराष्ट्र राज्य ) करणार आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा