बिलोली:(वार्ताहर):
मराठवाडा बहुभाषिक पत्रकार महासंघ बिलोलीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा व व्याख्यानाचा आयोजन करण्यात आले आज दि.20 फेबुरवारी रोज बुधवार शौकत फंक्शन हाल येथ करण्यात आला होता यावेळी महापुरषाचे विचार समाजात रुजवण्याचे काम करावे असे आव्हान शिवश्री धनराज पाटिल यानी केले.
मराठवाडा बहुभाषिक पत्रकार महासंघ बिलोलीच्या वतीने आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा व व्याख्यानाचा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शिवश्री धनराज पाटील बाभळीकर व मौलाना अहेमद बेग ईनामदार हे होते.कार्यक्रमाचे प्रमुख तहसीदार विक्रम राजपूत,नायब तहसीलदार संजय नागमवाड,नायब तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड़,नायब तहसीलदार यू.एस. निलावाड,उपसंपादक राम तरटे,रविंद्र बिलोलीकर,डॉ. नागेश लखमावार आदि होते .
यावेळी प्रस्ताविक नागोराव कुड़के यांनी केले यावेळी पुलमावा येथील शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजलि वाहण्यात आली.यावेळी प्रमुख वक्ते शिवश्री धनराज पाटील बाभळीकर यांनी शिवाजी महाराजांचा जीवन चरित्रावर आपले सखोल विचार मांडताना प्रत्येक समाजात महापुरुषाना जाती पाती मध्ये न बाटता तो सर्व समाजामध्ये रुजवनाचे काम करावे असे त्यांनी सांगितले यावेळी मौलाना अहेमद बेग ईनामदार यांनी शिवाजी महाराज हे एका समाजाचे राजे नव्हते तर ते मुस्लिम समाजाचे ही राजे होते त्यांच्या राज्य कारभारात अनेक महत्वाचापदी अनेक मुस्लिम विश्वासु सैन्य होते.यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत,राम तरटे,डॉ. रविंद्र बिलोलीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जीवनावर विचार व्यक्त मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गोपाल चौधरी नी केले तर आभार बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख फारुख अहेमद यांनी केले माजी अध्यक्ष विजय कुंचनवार,माजी उपाध्यक्ष शंकर मावलगे, डाॕ .लखमावार.सर अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव इंगळे एम. आय.एम.अध्यक्ष साजिद क़ुरैशी,बाबुराव देशमुख,इंद्रजीत तुड़मे,राजू पाटील,संतोष अंकुशकर,कृष्णा भोसीकर पञकार सय्यद रियाजआदि उपस्थित होते या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठवाडा बहुभाषिक पत्रकार महासंघाचे सचिव सतीश बळवंतकर,उपाध्यक्ष शेख युनुस, बालाजी नरहरे,इस्ताक अली,हाई पटेल,शेख माजीद,माधव दनतापल्ले आदिनी परिश्रम घेतले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा