" आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडीन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन."अशा प्रेरणादायी विचारवर चालणार व्यक्तिमत्व म्हणजे स्व.मारोती आनंदराव डांगे हे होते त्यांनी समाजात वावरत असतानी खुप लहाण वयात मोठी यशाची उत्संग भरारी घेतली होती.कंधार, लोहा तालुक्यातील राजकीय परिस्थितीवर वेळोवेळी सडेतोड लिखाण करून आणि सबंध राजकारणाचा सखोल अभ्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणून स्व.मारोती डांगे परिचित होते. त्यांच्या चौफेर लिखाणामुळे ते सदैव आठवणीत राहतील. त्यांचे लिखाण राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करण्याबरोबरच समाजाला दिशा देणारे होते. कंधार लोहा तालुक्यातील प्रत्येक गाव आदर्श व्हाव व पुढे जाव, असा त्यांचा ध्यास होता. त्यामुळे ते कधी लिखाणातून तर कधी प्रत्यक्ष भेटीतही हा मुद्दा पुढे घेऊन जात. साहित्य, कला, संस्कृती व शेतीवर त्यांनी प्रचंड प्रेम केले. त्यांच्या सहवासात याच विषयावर मी त्यांच्याशी चर्चा करत असे.त्यांचा राजकारणाचा सखोल अभ्यास असल्यामुळे अनेक मोठे नेते त्यांचे मत जाणून घेत. तसेच त्यांनी लिहिलेल्या लेखातून काही नेत्यांची झोप उडालेली मी पाहिली आहे.स्व.मारोती डांगे यांनी बर्याच पञकार संघटनेशी एकरुप होवुन कामे केली व मने जिंकली त्यात नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे सच्चे सदस्य,कंधार तालुका मराठी पञकार संघाचे उपाध्यक्ष,उस्माननगर पञकार संघाचे अध्यक्ष,तर शैक्षणीक क्षेञात त्यांनी जि.प शालेय समिती उपाध्यक्ष तर सामाजिक क्षेञात तंटामुक्ति उपाध्यक्ष अशा पदांचा अनुभव होता तर त्यांनी या सर्व क्षेञात काम करतेवेळेस बर्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यामध्ये समाजभुषण पुरस्कार या अन्य बरेच संपूर्ण आयुष्य त्यांनी पत्रकारितेत घालविलेले स्व. मारोती डांगे स्वभावाने शांत, सरळ आणि मितभाषी होते. पत्रकारितेत आक्रमक आणि संयमी असे दोन प्रकार सर्वसाधारणपणे दिसून येतात. स्व.मारोती डांगे पत्रकारिता सौम्य आणि संयमी, पण ठोस अशीच होती. त्यांच्या सच्छिल पत्रकारितेचे चाहते कंधार लोहा भागात मोठय़ा प्रमाणावर होते. पत्रकारितेत धडपडणाऱया सर्वांसाठीच, मग तो नवखा पत्रकार असो की अनुभवी, माध्यमांच्या सध्याच्या जगात हा गुण अत्यंत दुर्मिळ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्याजवळ असलेले विचारधन पत्रकारितेत धडे गिरवणाऱया अनेकांना मुक्तहस्ते देणारा मारोती डांगे यांच्यासारखा 'पत्रकार' विरळाच.स्व.मारोती डांगे यांचा जन्म 7 मार्च 1974 साली एका गरीब कुटुंबात कंधार तालुक्यातील शिराढोण येथे झाला त्यांचे वय वर्ष 3 असतेवेळेस अचनाक त्यांच्या वडिलांचे छञ हरवले त्यानंतर स्व.मारोती डांगे यांच्या सोबत त्यांची आई मोठी बहिण आणी छोटी बहिण यांच्या विचाराणे व सोबतीने 9 वी पर्यंतचे शिक्षण भिमाशंकर विद्यालय शिराढोण येथे झाले तर 10 ते 12 वी पर्यंतचे शिक्षण हे शिवाजी हायस्कुल कंधार येथुन पुर्ण केले त्यानंतर त्यांनी डिग्रीचे शिक्षण घेत असताच ग्रामिण भागातुन त्यांनी दै.लोकाशा पासुन ते दै.देशोन्नती पञकारीतेस सुरवात केली व अशा अनेक दैनिकांत त्यांनी काम करुण समाजाचे प्रश्न मार्गी लावले.असा अभ्यासू वृत्तीचा पत्रकार काळाआड गेला असला तरी त्यांच्या लिखाणातून मात्र ते सर्वांनाच कायम प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत.
लेखक:-
शुभम मारोतराव डांगे
मो .7774834052
मित्र ग्रेटच होता त्यातशंका नाही, प्रेरणादयी होता, आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थाना
उत्तर द्याहटवा