बिलोली (सय्यद रियाज)
महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघाच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी पत्रकार मारोती भालेराव तर कार्यध्यक्षपदी सुनिल कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे घोषीत संघाचे जिल्हाध्यक्ष अनुराघ पोवळे यांनी केले आहेत.या वेळी प्रमुख उपस्थिती संघाचे विभागीय प्रमुख विकास गजभारे, पत्रकार सुनिल कांबळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बिलोली तालुका शहर अध्यक्ष मुन्ना पोवाडे यांची होती.
सदर पञकार संघाची बैठक दि.23फेब्रुवारी रोजी संघाचे जिल्हाध्यक्ष अनुराग पवळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामग्रह बिलोली येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुरोगामी पञकार संघाचे नियम व अटी विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीचे प्रास्ताविक मावळते अध्यक्ष सुनिल कदम यांनी केले.सखोल चर्च अंती एल.पि.गोणेकर यांनी सुचविल्या प्रमाणे अध्यक्षपदी मारोती भालेराव तर कार्यध्यक्षपदी सुनिल कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या सोबतच संघाची कार्यकारणी पुढील प्रमाणे
आहे.सचिव डी.टी.सुर्यवंशी. संजय पोवाडे(उपाध्यक्ष) सुरेश देवकरे (सहसचिव), मार्तंड जेठे (संघटक), राजु बाभळीकर (प्रसिद्धी प्रमुख) , लालबा गोणेकर (कोषध्यक्ष)मारोती भदरगे व संजय जाधव (सल्लागार ) सदस्य वाघमारे प्रल्हाद ,गौतम वाघमारे ,प्रकाश फुगारे,विजय सोनकांबळे,कमलाकर जमदाडे,दिंगाबर काचमो या सदस्यासह मोठ्या प्रमाणात पत्रकार उपस्थित होते.आभार प्रदर्शन प्रकाश फुगारे यांनी केले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा