नांदेड .
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी समतादूत प्रकल्पाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे साजरी करण्यात आली यावेळी सुरवातीस उपजिल्हाधीकारी अनुराधा ढालकरी व समतादूत जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात केली. बार्टी कडून जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला यात आशाबाई कांबळे,गीयानबाई वाघमारे,सुशीलाबाई लिंगायत,वंदना यमलवाड,राजश्री सारंगधर,अंजनाबाई कदम,सुनिल वेद,शिवाजी चुनकवाड,सूर्यकांत कस्तूरकर,दिलवर पठाण यांना गौरविले.यावेळी बार्टी समतादूता कडून गाडगेबाबा यांच्या जीवनातील शैक्षणीककार्य ,अंधश्रद्धा कर्मकांड निर्मूलन,स्वच्छता या विविध कार्यावर प्रकाश टाकणारे पथनाट्य सादर करण्यात आले.यात समतादूत राणीपद्मावती बंडेवार यांनी गाडगेबाबांच्या वेषात प्रबोधन केले यांच्या सह समतादूत अविनाश जोंधळे,दिलीप सोंडारे, ज्योती जाधव,शेख इर्षाद,महेश हिंगोले,सचीन घूले,खंडू फोले,विनोद पाचंगे ,दीपली हाडोळे,ज्योती जोंधळे,शारदा माळे, जगदीश निवळे,दीगंबर पोतूलवार,बालाजी डुमने यांचा सहभाग होता कार्यक्रम यशस्वीते साठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी रावसाहेब पोहरे,श्री जोशी तसेच जिल्हातील सर्व समतादूतांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा