बिलोली:-
शासनाच्या वतीने यावर्षी 7 मे 2019 अक्षयतृतीये पासुन दरवर्षी महात्मा बसवेश्वर सामाजीक समता"शिवा"पुरस्कार देण्यात येणार आहे असे शिवा संघटनेचे तालुकाप्रमुख महेश पा.हांडे,शिवा विद्यार्थी आघाडीचे तालूकाप्रमुख मनोहर वसमते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
शिवा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत युवक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रा. मा.मनोहरराव धोंडे सर यांनी शिष्टमंडळ घेऊन मार्च 2015 मध्ये या मागणी सह इतर 14 मागणी चे निवेदन मुख्यंमत्री मा.देवंद्र फडणवीस व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले साहेब यांना घेऊन चर्चा केली होती त्यानुसार सदरील पुरस्कार देण्याचे निर्णय 5 जुन 2016 रोजी झालेल्या बैठकीत शासनाने घेतला होता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा आदेश दि.08 मार्च 2019 रोजी शासनाचे सहसचिव भा.र.गावीत यांनी काढले आहे25 हजार रोख व संस्थेस 50 हजार रूपये रोख स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र,शाल,श्रीफळ,असे स्वरूप राहणार आहे.शासनाच्या या निर्णयाचे शिवा संघटना बिलोली तालुक्याचे तालुका प्रमुख महेश पा.हांडे,शिवा विद्यार्थी आघाडी तालुकाप्रमुख मनोहर वसमते,तालुकाउपाध्यक्ष शिवा शिवशेट्टे,व्यकट पा.कुरे, परशुराम पा. मंगरूळे,सतोष शिवशेट्टे,शिवाजी पा चंदनकर,राजु बामने,विठ्ठल शिवपनोर,गजानन दुडले,भगवान हांडे,अनुप पा.डोनगावकर,आदीनी स्वागत केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा