सगरोळी ता.२०
येथील श्री छञपती शिवाजी हायस्कूल अटल लॕब टिंकरिंग च्या वतीने रोबोटिक्स वर्कशाॕप चे आयोजन दि.२३ ते २४ मार्च दरम्यान करण्यात आले आहे असून,इंडियन इन्स्टीट्युट आॕफ टेक्नालाॕजी व नॕशनल रिसर्च सेंटर मुंबई यांचे यावेळी विद्यार्थांना मार्गदर्शन लाभणार आहे,अटल टिंकरिंग लॕबचा उद्देश बदलत्या काळातनुसार विद्यार्थांना विज्ञानाबरोबर तंञज्ञानाची माहीती मिळाली तर विद्यार्थांच्या सुप्तगुणांना वाव मिळवून दिल्यास कल्पकता व चिकित्सकता वाढून नविन शास्त्रज्ञ उदयास येउन नवनवे संशोधन होईल.
हे दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याने,जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभागी होउन यासंधीचा फायादा घ्यावा.प्रवेश शुल्क रुपये ९००(किटसह) व बिगर किटसह रूपये ५०० भरुन लाभ घ्यावा असे आहवान अटल टिंकरिंग लॕबचे संयोजक अमोल घोगरे यांनी केले आहे.संपर्क(७७०९३८६१२५)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा