बिलोली शहरात मटक्याचा चटका अनेकांना लागला असून, मिलन झोपू देईना अशी अवस्था मजुरदार, शेतकऱ्यांसह हातावर पोट असलेल्यांची झाली आहे. या दोन नंबरच्या प्रकाराकडे स्थानिक प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे.
बिलोली शहर हे तेलंगाणा सीमावर्ती असल्याने अवैध धंद्यसाठी माहेर घर बनले आहे. बिलोली शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदेयांनी थैमान घातले असून, येथील तलाव परीसर बोधन रोड झाडे , झुडपात , ईतर परिसरात ‘मुंबई कल्याण’ मोबाईल मटकाचे क्रेझ वाढले आहे. सध्या या परिसरात मटका चालविणारे मटका किंग हे भ्रमणध्वनी द्वारे मटक्याचे आकडे काढून लाखो रुपयांचा उलाःढाल बिलोली शहरात होत आहे. या मटक्यावाल्यानी घरपोच सुविधा आपल्या ग्राहकांना दिली आहे. मटक्याचे नंबर लागले की लगेच पैसे घेण्यासाठी कस्टमर या मटकावाल्यांच्या घरी चकरा मारतात. हे इथेच थांबत नसून मटका लागाला कि अकाउंट डोर to डोर केले जात आहेत. हा सर्रास प्रकार सध्या बिलोली शहरात चालू असताना प्रशासन मूगगिळून बसली आहे. अनेक ठिकाणी शहरातील प्रतिष्टीत लोक मटका चालवीत आहे. मटके प्रमुख ठिकाण स्वतःचे घर पान शॉप, अँटो व फिरते दलाल अश्या माध्यमातून हा मठक्याचा धंद्धा जोर धरला आहे. बंद करण्याची मागणी होत आहे..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा