ता. प्र
कासराळी ता. बिलोली अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बिलोली यांच्यावतीने कासरळी यथे होळी सणानिमित्त पर्यावरणपुरक होळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाखेचे कार्यकर्ते व युवकांनी कासराळी बाजार पेट परिसराची स्वच्छता केली. सुका कचरा गोळा करून, कचऱ्याची होळी केली. यावेळी युवतींना खोबरांचे हार भेट देण्यात आले. युवतींच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. यावेळी कर्णकर्कश शिव्यांऐवजी कचऱ्याची होळी.. गरीबाला पोळी.., होळी लहान करा.. पोळी दान करा.., शिव्या देऊ नका.. कटूता घेऊ नका.. यासारख्या नाऱ्यांनी निवेदनात पर्यावरण संवर्यांनी दिला.यावेळी अंनिस कार्यकर्ते कमलाकर जमदाडे,ऋतुजा जमदाडे, क्षितिजा जमदाडे यांच्यासह गावातील युवक,बळीराम गजलोड,चंद्रशेखर ईबितवर, नवनाथ सोमासे,सतीश मुंगडे, आनंद म्हैसकर,अविनाश म्हैसकर,आकाश म्हैसकर,सोमसे अविनाश,फैजान शेख, उपस्थित होते. शेवटी आभार गजानन मैष्कर यांनी व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा