१७ मार्च २०१९

शाळेत आठवडी बाजारांतून विद्यार्थ्यांनी गिरवले धडे



सांगली (ता जत )पांडोझरी येथील बाबरवस्ती व कोकरेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी  शाळेतील विद्यार्थ्यांनी सहशालेय उपक्रमाअंतर्गत

 "चला जाऊ बाजारा"

या मेळाव्याच्या निमित्ताने आठवडी बाजार भरविला. विद्यार्थ्यांनी विविध वस्तू व भाजी -पाला  खरेदी-विक्रीचा अनुभव घेतला .प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी  शाळेच्या ठिकाणी असणाऱ्या बाजारपेठेत वांगी ,मेथी, शेवग्याच्या शेंगा, ज्वारी, गहू, बाजरी, कांद्याची पात, लसुन, बेदाणे,  कोथिंबीर, शेपू ,पालक ,टोमॅटो,पत्ताकोबी,फुलकोबी,पेरु,शालेय साहित्य विक्री साठी ठेवण्यात आले होते. अशा विविध प्रकारच्या भाज्या विक्रीस आणल्या होत्या .

खरेदी  करताना हिशेब ,वस्तुची बारबाकाईने पाहणी याचे ज्ञान विद्यार्थ्यांना झाले.

बाजाराचे उद् घाटन योजना पुजारी व केंदारी चव्हाण व  यांनी केले. मोहन टोणे हे उपस्थित होते.आणि घ्या हो घ्या.... असे म्हणत बाजार भरला विद्यार्थ्यांनी अनेक स्टॉल लावले होते विविध वस्तू व भाजीपाला विक्री करीत खरेदी विक्रीचा अनुभवमुलांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान असावे, तसेच गणितातील किलो, डझन, बेरीज, वजाबाकी या संकल्पना स्पष्ट व्हाव्या या उद्देशाने

बाबरवस्ती व कोकरेवस्ती  शाळेतील  विद्यार्थ्यांनी  आठवडे बाजार हा उपक्रम राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांनी स्वत: बाजार चालवून भाजीपाल्याची विक्री केली. पालक व इतर विद्यार्थ्यांनी खरेदी करीत या उपक्रमात सहभाग घेतला. यात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विविध  भाजीपाला किराणा खाद्यपदार्थही मांडले होते. खरेदीसाठी पालक व गावकऱ्यांनी मोठा उत्साह दाखविला विशेष बाब म्हणजे सर्व विद्यार्थ्यांकडून सर्व ग्रामस्थानीं जास्त प्रमाणात खरेदी केली.
विद्यार्थ्यांनी व्‍यवहारज्ञानाचे धडे गिरवले. येथे विविध वस्तू खाद्यपदार्थ व भाजीपाला खरेदी करण्यासाठी पालक व  गावकऱ्यांची गर्दी झाली होती.

विक्री होत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह पहावयास मिळाला होता

आठवडी बाजार संकल्पनेतून विद्यार्थ्यांना व्यवहार कसा करावा याचे ज्ञान मिळाले या बाजारात खरेदीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पांडोझरी  येथील इयत्ता पहीली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.यावेळी  बाबरवस्ती शाळेतील  मुख्याध्यापक दिलीप वाघमारे,कोकरेवस्तीचे मुख्याध्यापक शशिकांत सावंत, नितीन मावस्कर,  बाजार यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...