बिलोली - लोहा जिल्हा नांदेड येथील वृत्तपत्र विक्रेते पांडुरंग रहाटकर यांना लोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांनी त्यांच्या वृत्तपत्र स्टॉल वर जाऊन मारहाण केल्याप्रकरणी बिलोली तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे . अटक करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा ही पञकारांच्या वतीने देण्यात आला.
लोहा येथील वृत्तपत्र विक्रेते रहाटकर यांनी लोहा येथील व्हाट्सअप ग्रुप वर लोहा नगरपालिकेसाठी शासनाकडून आलेल्या पाच कोटी रुपयांच्या निधिआनूदानाची पोस्ट केले होते यावरून लोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांनी या पोस्टला राजकीय स्वरूप असल्याचे सांगत तू ही पोस्ट का टाकलास हे जाब विचारत दि. 26 रोजी लोहा बस स्टँड मधील वृत्तपत्र स्टॉलवर पांडूरंग रहाटकर आपले नित्य नियमाचे काम करीत असताना त्यांना मारहाण केली याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून सोनू संगेवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा निषेध म्हणून बिलोली तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला या वेळी राजू पाटील, वलीओद्दीन फारुखी,शेख फारुख , मारोती भालेराव , साईनाथ आरगुलवार , बाबूराव इंगळे ,सय्यद रियाज ,दादाराव इंगळे, माधव एडके,शेख सुलेमान , साजिद कुरेशी, नागेश कोंडावार , ईरेश माचलोड, आदि उपस्थित होते. संगेवार यांना लवकर अटक करा नाही केल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला . सदरिल निवेदन नायब तहसिलदार चव्हाण व पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांना देण्यात आले ,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा