आपला संपूर्ण भारत देशच आज “पाणी” या विषयावर चिंतीत आहे. गेल्या एक दोन दशकात पावसाचे कमी झालेले प्रमाण व अनियंत्रित खोदलेल्या बोअरवेल व त्यातून होणारा बेसुमार पाणी उपसा यामुळे भयानक संकट समोर उभा टाकले आहे.
पाण्याच्या पुनर्भरणाचे महत्व लक्षात घेऊन कृषि विज्ञान केंद्र सगरोळी व ऊर्ध्वम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बोअरवेल पुनर्भरण या विषयीची एकदिवसीय कार्यशाळा आज दि. १४ मे २०१९ रोजी पार पडली. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून श्री विनीत फडणीस डायरेक्टर ऊर्ध्वम पुणे, प्रदीप कुलकर्णी प्रचार, प्रसार व विक्री विकास अधिकारी ऊर्ध्वम पुणे, श्री प्रणीत डफळ सिनीअर टेक्निशियन यांनी मार्गदर्शन केले. डॉ.सुरेश कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून शेती करणे हि काळाची गरज आहे असे सांगितले. श्री विनीत फडणीस यांनी पॉवरपॉइंट सादरीकरण द्वारे ६ व ८ इंची बोअरवेल चा अत्यंत शास्त्रीय पद्धतीने बोअरवेलचा पाणीसाठ वाढविण्याचे तंत्रज्ञान समजून सांगितले. आपल्या घरातील, सोसायटीतील अथवा शेतातील बोअरवेलचे पाणी वाढवण्यासाठी “बोअरवेल रिचार्ज” तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे श्री प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. दुपारच्या सत्रात कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रात श्री प्रणीत डफळ यांनी बोअरवेल पुनर्भरणाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या प्रशिक्षणाचा नांदेड जिल्ह्यातील ३२ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन इंजी. वैजनाथ बोंबले यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा