सरपंच सौ. साविञाबाई घाटे यांनी विद्युत वितरण कार्यालयाला दिला इशारा.
झुकलेले विद्युत खांबाकडे महावितरणाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष
बिलोली प्रतिनिधी (सय्यद रियाज)
झुकलेले विद्युत खांब, लोंबकळलेल्या विजेच्या तारा वाऱ्याबरोबर हेलकावे घेत असल्याचे चित्र तालुक्यातील मौजे गंजगाव गावांच्या परिसरात आहे. या तारांना शेतीमशागतीचे कामे करतांना ट्रॅक्टर, शेतकऱ्याचा धक्का लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे मात्र महावितरणचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सरपंच सौ. साविञाबाई घाटे यांनी केला आहे वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा ओढून घेण्याची मागणी केली आहे.
जुन्या विद्युत वाहक तारा, खांब कमकुवत झाले आहेत. परिणामी थोड्याशा सोसाट्याच्या वाऱ्याने तारा एकमेकांना घासल्यास वीजपुरवठा खंडित होतो; तसेच वारा जास्त वेगाने आल्यास खांब वाकतात. कित्येक ठिकाणी विद्युत खांबाचे ताण गायब झालेले आहेत, मात्र वीज वितरण कंपनीने हे ताण पुन्हा बसविण्याची तसदी घेतली नाही. वास्तविक पाहता पावसाळा लागण्यापूर्वी प्रत्येक विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्यी क्षेत्रात तारा, खांब याचा आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी तारा बदलणे, झुकलेले खांब सरळ करणे, ताण देणे, लोंबकळलेल्या तारा सरळ करणे, तुटलेल्या तारा जोडणे, झाडांच्या फांद्या छाटणे ही कामे प्राधान्याने करणे गरजेचे आहे. याकडे महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमशागतीची कामे करताना अडचण येत आहे; तसेच एखाद्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही कामे करण्यात यावी परवाच दिंनाक13-05-2019 रोजी गंजगाव जुन्यागावातील एल.टी.लाईनमुळे रोडवर विद्युत तारेचा धक्का लागुन लातुर येथिल एका चालकाचा जागीच मुत्यु झालेला आहे आणि गंजगाव पासुन थोड्या अंतरावर आसलेले कोटग्याळ या गावाच्या शेजारी कडब्याची ट्र्क जळुन खाक झाली आहे . महावितरण कंपनी आणी किती जणाचे बळी घेणार आहे या खांब व तारे संबधाने आम्ही आपणास आनेक वेळा निवेदन देवुन सुध्दा या गंभीर बाबीकडे आपण लक्ष दिलेले नाही दि.30 मे पर्यत या बाबत कार्यवाही नाही झाल्यास आपल्या कार्यालया समोर आदोलन करण्याचा इशारा सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे यांनी शाखा अभियंता विद्युत वितरण कार्यालय कुंडलवाडी यांना एका निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा