२२ मे २०१९

सामाजिक वनीकरण विभागामार्फत होणाऱ्या बोगस कामाची तात्काळ चौकशी करुन वनपाल यांना निलंबित करा -विक्रम पाटील बामणीकर



मराठा महासंग्राम संघटनेची मागणी                 

शिराढोण (शुभम डांगे)     
शासनाने सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत दरवर्षी 33 कोटी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला खरा पण याच विभागात रोपे लावण्याच्या खड्ड्यामध्ये जेवण करण विभागाने ठरवून दिल्याप्रमाणे होत सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी आपल्या मर्जीप्रमाणे काम करत असून या कामात शासनाचे नियम धाब्यावर ठेवल्याचे दिसून आले आहे शासनाच्या नियमाप्रमाणे रोपे लावण्यासाठी खड्ड्यांची लांबी 2 मीटर रुंदी 2 फूट खोली 1 फूट असे असताना सदरील काम लांबी 1 मीटर आणि खोली अर्धा फूट असे बोगस काम होत आहे त्या कामाची चौकशी करून वनपाल यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन

नांदेड जिल्हाधिकारी साहेब व मा विभागीय वन अधिकारी साहेब सामाजिक वनीकरण नांदेड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे सदरील हे काम वनपाल लखुजी शिंदे दहीकळंबेकर हे स्वतः गुत्ते घेऊन मजुरांमार्फत काम करत आहेत मजुराला सोळा रुपये प्रमाणे कडे देऊन वरील सर्व कटे बोगस करून स्वता निधी हडपण्याचे काम करत आहे . विशेष म्हणजे या अगोदर खोदण्यात आलेल्या चारी मधील गाळ काढून खड्डे केले जात आहेत सदरील काम हे नवीन जागेत खड्डे करून करावयाचे असतानादेखील सामाजिक वनीकरण चे वनपाल स्वतः मजूर लावून मजुरांना 16 रुपये प्रमाणे प्रति खड्डा ठरवून दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी अतिशय बोगस काम करणाऱ्या वनपालाची खातेनिहाय चौकशी 15 दिवसाच्या आत करावी त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन दिनांक 17.5.2019 रोजी दिले आहे दिलेल्या निवेदनावर मराठा महासंग्राम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख बजरंग पाटील हरकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...