बिलोली - कासराळी गावची लोकसंख्या जवळपास सहा हजारावर आहे या गावासाठी कायम पाणीपुरवठा अर्धवट व बंद असल्यामुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे या गावांमध्ये नागरिकासाठी तात्पुरत्या स्वरूपात विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे विहिरीला अपुरेपणा असल्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही गावकऱ्यांनी वेळोवेळी पाण्यासाठी तक्रार करून देखील कासराळी ग्रामपंचायत व बिलोली पंचायत समितीचे या पाण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे. गावाची लोकसंख्या प्रमाणे पाच टँकर सुरू करावे कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात यावे सण 2008 मध्ये भारत निर्माण कार्यक्रम पेयजल कार्यक्रम झाल्यानंतर 74 लाख 94 हजार इतकी निधी मंजूर करण्यात आली होती तत्कालीन पाणीपुरवठा समिती अध्यक्ष व सचिव यांनी संगनमत करून अर्धवट व निकृष्ट दर्जाचे थातूरमातूर कामे केली व लोकसहभागातून जमा केले नीतीधीचा अपहरण करून शासनाची व जनतेची फासवनूक केली संबंधितांवर गुन्हे करण्याची मागणी
करण्यात आली.. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम हैगले यांच्या नेञत्वाखाली करण्यात आले, उपोषणकर्ते पिराजी चरकुलवार , दिपक संदलोड माजीद शेख, लक्ष्मण फुलारी, कैलास सुर्य. शिवा पाटील, विनोद बोराडे साईराजे शिंगोड सायलू बरसमवार, चंद्रकांत भुरे, शफीखान पठाण , ज्ञानेश्वर घाबरोड , बजरंग चरकुलवार , लक्ष्मण चरकूलवार, देविदास शंकरोड, सुरेश बोरोड, हणमंत गजलोड, बालाजी शिंगोड, या सह असख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आता कासराळी ग्राम पंचायत नागरिकांना पाणी पाजवणार की फक्त पाहत राहणार , प्रशासन आता कोणती कार्यवाही करणार आता गावकर्याचे लक्ष
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा