सांगली संख : पांडोझरी (ता जत)येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची 'सेवासन्मान राज्यस्तरीय सर्वांग सुंदर शाळा' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पूर्व भागातील आसंगी तुर्क केंद्रातील पांडोझरी येथील बाबर वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील शिक्षकांनी सतत विद्यार्थीच्या सुप्त गुणांचा वाव देत शालेय स्तरावर विद्यार्थीच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवेल आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनातून इंग्रजी व गणित विषयाची भिती काढून अत्यंत सोप्या पध्दतीने शिकवून विद्यार्थीमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण केली.
शालेय परीसर व वर्गाच्या भिंती बोलक्या केल्या आहेत.शालेय परिसरात झाडे लावून संगोपन केले आहे. लोकसहभागातून टॅकरने पाणी घालून जोपासना केली जात आहे.मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी उन्हाळ्याची सुट्टी न घेता चिमुकल्याच्या मदतीने झाडे लावून हिरवागार केला आहे.
या सर्व कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वत्तीने या शाळेला सर्वांग सुंदर शाळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्यात जिल्हानिहाय निवड समिती स्थापन केली होती.समितीने आदर्श शाळाची निवड केली आहे .
या यशाबदल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सविता बाबु मोटे,प्रकाश बाबर व गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब जगधने साहेब व शिक्षणविस्तार अधिकारी आर.डी.शिंदे,गवारी साहेब, केंद्र प्रमुख रमेश राठोड,रामचंद्र राठोड यांनी अभिनंदन केले. या शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी मुख्याध्यापक दिलीप वाघमारे परिश्रम घेतले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा