नांदेड दि.02जून रविवार डेबूजी युथ ब्रिगेड च्या वतीने आढावा बैठक हॉटेल विसावा पॅलेस शिवाजी नगर नांदेड येथे अत्यंत भव्यदिव्य प्रकारे घेण्यात आली. गाडगेबाबा ना भारत रत्न संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ तसेच S.C.आरक्षण या प्रमुख मागण्यांचा विचार संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ वरणकार, दादासाहेब ननावरे,राहुल चव्हाण यांनी मांडला.महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून adv रानिताई रंधे तळेकर,प्रदेशाध्यक्ष म्हणून adv गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ तेलंगे,जिल्हाकार्याध्यक्ष बाळासाहेब(बालाजी) तेलंग,उपाध्यक्ष प्रवीण सुर्यकर, मार्गदर्शक महेश मुखेडकर यांनी केले तर सूत्रसंचालन आदिनाथ चिंताकुटे तसेच जिल्हासंघटक नरेंद्र संगमकर,भोकर तालुकाध्यक्ष चंद्रकांत बरबडेकर, परमेश्वर इबीतवार,रामेश्वर लोणवडे यांचे विशेष सहकार्य लाभले. नाशिक विभागीय अध्यक्ष नितीन भाऊ रणशिंगे, पुणे विभागीय अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांनी आपले विचार मांडले.नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब तेलंग यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांनी मागील 10 वर्षांपासून समाजकारणात सक्रिय असल्याचे सांगितले.
नांदेड जिल्हाध्यक्ष संतोष तेलंगे यांनी सर्वांचे कार्यक्रमास उपस्थित राहून अमूल्य वेळ दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा