बिलोली
आद्य लोकशाही जनक,जगाला समता,बंधुत्वता व समानतेचा संदेश देणाऱ्या विश्वगुरू जगद्ज्योती महात्मा बस्वेश्वर महाराज यांच्या विचारांची समाजाला जाणिव व्हावी या उद्देशाने लिंगायत समन्वय समिती,बसव ब्रिगेड व अनुभव मंडप समितीच्या वतीने महाराष्ट्रात बसव संदेश याञा काढण्यात येत आहे.दि.०३ जुन रोजी बसव संदेश रथ याञेचे बिलोली शहरात भव्य असे स्वागत करण्यात आले.
भारताचे माजी राष्ट्रपती बी.डी.जत्ती यांचे सुपूञ तथा बसव समिती अध्यक्ष बेंगलुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत १३ फुट उंच भव्य अशा बसवन्नाच्या मुर्ती रथाचे बिलोली शहरात आगमन होताच टाळ,मृदुग व बस्वेश्वर महाराजांच्या भजन गितांनी स्वागत करण्यात आले.शहरातील जुना बस स्थानक चौक ते शिवाजी पुतळ्यापर्यंत भव्य अशा बसव संदेश रथाची याञा काढण्यात आली.छञपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात १३ फुट उंच अशा बस्वेश्वर महाराजांच्या प्रतिकृतीस तालुक्यातील समस्त लिंगायत समाजाच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले तर भारताचे माजी राष्ट्रपती बी.डी.जत्ती यांचे सुपूञ तथा बेंगलुरू बसव समिती अध्यक्ष अरविंद जत्ती यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन बसव संदेश याञेच्या पुढील प्रवासास निरोप देण्यात आला.यावेळी माजी आमदार गंगाधरराव पटणे,जेष्ठ पञकार गोविंद मुडकर,बसव ब्रिगेडचे अविनाश भोसिकर,पो.नी भगवान धबडगे,विक्रम साबने,विश्वनाथ समन,शिवाजी पा. जाधव,बाबाराव रोकडे,आनंदराव बिराजदार,उमाकांत गोपछडे,सग्राम हायगल्ले,शांतेश्र्वर पा.लघूळकर,शंकर माउलगे,अॅ.बाबुराव देशमूख शिवाजी पांडागळे,हानमंत कनशेट्टे,प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.तर बसव संदेश याञेचा बिलोली येथील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बसव ब्रिगेडचे जि.संघटक शंकर महाजन,शिवराज बामणे,गिरीराज बाबणे,शिवकुमार कोदळे,मनोज महाजन,अक्षय मुंडकर,विरानंद हायगल्ले,सचिन मोघे,कृष्णा इद्राक्षे,अमोल पाटील,राजू गूणेपवार,अदिनाथ बाबने,ओम बाबणे आदींनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा