०५ जून २०१९

पर्यावरण दिन विशेष ५जून २०१९

 

             ( जिल्हा सांगली) संख! राज्यातील विविध  जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा सुरू आहे .असे आसताना दुष्काळी जत तालुक्यातील पूर्व भागात पिके व झाडासाठी तर दूरच, पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण बनले आहे अशा परिस्थितीत  *(पांडोझरी )येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद  शाळेतील  विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना* सोबत घेऊन शाळेतील झाडे वाचण्याचा प्रयत्न करीत आहे.  पाणी मुरावे म्हणून शाळेच्या चारही बाजूने चरी काढून घेतल्या  आहे  पण पाऊसाचा पत्ता नाही म्हणून  टँकरचे पाणी सोडून त्यातून  वृक्ष जगविण्याची धडपड केली  जात आहे.  गेली  पाच वर्षे शाळेतील मुले व शिक्षक उन्हाळी सुट्टीसाठी न जाता वृक्ष संगोपनासाठी सुट्टी  घालवत आहेत  हे पाहून पालकांनी दर वर्षी किमान एक दोन टँकर उन्हाळी सुट्टीत  झाडे वाचविण्यासाठी देत आहेत  .


या वर्षी दुष्काळाची झळा पहाता मुले कशी पाणी घालत आहेत,हे बघून पर्यावरणप्रेमी श्रीशैल यळझरी या शेतकरी मालकानी संपूर्ण उन्हाळा भर तुमच्या  शाळेतील झाडांना टँकरणे पाणी देतो असे शब्द मुलांना  दिले  आणि हा विश्वास दिल्यावर मुलांनी चार तारखेला सुट्टी घेतली.  जानेवारी पासून मुले दररोज कँनने पंप हापसून पाणी घालत असतात  पण हातपंपला ही पाणी नसल्यामुळे आपल्या स्वतःच्या  पाण्याच्या बाटली मधील पाणी घालत होते. हे सर्व पाहून संख येथील शेतकरी बाबरवस्ती शाळेसाठी मायबाप झाले आणि वृक्षानां जिवनदान दिले.
                                                 पाणी विक्री तेजीत सुरू असतानाही श्री.श्रीशैल बसगोंडा यळझरी यांच्याकडून झाडासाठी पाण्याचा  आज पर्यत सात खेप   टँकर मोफत  देवून वृक्ष संगोपन करत आहेत.               
#पाण्याचा टँकर आठ हजार लिटर चा आहे.
         शाळेत एकोणसत्तर वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. झाडाची लागवड करुन त्यांना दुष्काळात ही यशस्वीरीत्या माळरानात जगवले जात  आहे.विशेष म्हणजे शाळेला भेट देणारे अधिकारी असो  वा विद्यार्थी ,पालक किंवा माझी विद्यार्थी किंवा वस्ती च्या परिसरात राहणारे ग्रामस्थ या ठिकाणी येऊन  या झाडांना पाणी टाकून त्यांची निगा  राखतात.लहान  मुलांनी वृक्षारोपण व वृक्ष संगोपन खुप मनापासून  करतात लोकसहभागातून वृक्षारोपन व वृक्षसंगोपन केले  जाते या ठिकाणी  लिंबू ,नारळ,चिंच ,अशोक ,कडुलिंब,जास्वद,जांभूळ,गुलमोहरा,मोरपंकी ,सिताफळ,इतर अशी  वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत.           

पर्यावरणप्रेमी ही बाबु मोटे,केरुबा गडदे,आप्पासो मोटे,निंगाप्पा वज्रशेट्टी, नामदेव मोटे,आयुब जमखंडीकर,चंद्रकांत कांबळे ,मैहबुब जमखंडीकर ,प्रकाश बाबर,मारुती बाबर,तुकाराम बाबर,पुंडलिक खांडेकर,तानाजी कोकरे,आकाश गडदे,बंडू गडदे,दत्ताञय कोरे,आप्पासो गडदे,धयाप्पा गडदे,माणिक बाबर,संदिप कर्वे शाळेतील सर्वच विद्यार्थी व शिक्षक पालक व ग्रामस्त यांचे सहकार्य मिळते आहे.          विद्यार्थी ,शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती बाबरवस्ती यांनी राबविलेल्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे !!                                                                                                                                               


हंडाभर पाण्यासाठी  मैलोन् मैल पायपीट करावी लागत आहे. वाड्या वस्त्या विहीरी व डोहातील पाणी खरवडून घ्यावे लागत असल्याची  विदारक स्थिती निर्माण झाली  आहे.पाणवठे,विहिरी कोरड्या झाल्यात. सगळीकडेच दुष्काळजन्य स्थिती  निर्माण झाली. निश्चितच  ही स्थिती  भयावह आहे. निदान आतातरी या प्रत्येक नागरिकाने गांभीर्याने विचार करुन मोठ्या प्रमाणात झाडे लावून वृक्ष संगोपन केले पाहीजे बरोबर पाणी अडवा आणि पाणी जिरवा हे धोरण राबविणे गरजेचे आहे .मुख्याध्यापक दिलीप वाघमारे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...