कोरणा संसर्ग हे मानवी अस्तित्वावर आलेले संकट असून भूमिपुत्रांनी कोरोणा विरोधी देव -दूत सरकारी यंत्रणेला साथ द्यावी - बालाजी बच्चेवार
संपूर्ण देशामध्ये कोरोना व्हायरस संसर्ग थैमान घातले असून हे मानवी अस्तित्वावर आलेले संकट असून भूमिपुत्रांनी ,नवतरुणांनी कोरणा विरोधी देव -दूत सरकारी यंत्रणेला साथ द्यावी.
आशा महाकठीण संकट समयी राज्य हित आणि राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून सुजाण नागरिकांनी भूमिपुत्रांनी पोलीस प्रशासन आणि ,आरोग्य विभाग अशा विविध कोरोना विरोधी सरकारी यंत्रणा स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या यंत्रणेला स्वयंस्फूर्तीने साथ द्यावी .असे नम्र आव्हान भाजपाचे जेष्ठ नेते मा .बालाजी बच्चेवार यांनी केले आहे
कोवीड19 अर्थात कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी देशाचे नेते मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी टाळेबंदी अर्थात (लॉक डाऊन) घोषित करून विविध रित्या कोरोनाची कडी तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. या महामारीच्या प्रचंड संकटाने महाराष्ट्र राज्यसह संपूर्ण भारत देशाचे प्रचंड नुकसान होत असून आर्थिक नुकसानीच्या प्रचंड झळा देशाला सोसावे लागत आहेत. भविष्यात आर्थिक मंदीचे मोठे सावट असणार आहे? कोरोना संसर्गामुळे मानवी अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.
काळाची पावले ओळखून भविष्यात निर्माण होणाऱ्या धोक्याचे संकेत ओळखून मा. पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आपण सर्व सुजाण नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने भूमिपुत्रांनी कोरूना विरोधी लढा लढत असलेल्या सरकारी यंत्रणेला साथ द्यावी .गावोगावी, चौकात, रस्त्यावर पोलिसांनी प्रतिबंध करण्यापेक्षा राष्ट्रहितासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सुरक्षित घरी राहून, सामाइक अंतर (सोशल डिस्टन्स) ठेवून मास्क, वापरून संसर्ग टाळावा कोरोना व्हायरसची कडी तोडण्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलिस यंत्रणा व इतर यंत्रणा यांना नवतरुणांनी भूमिपुत्रांनी मातृभूमीवर आलेले संकट दुर करण्यासाठी लॉक डाऊन यशस्वी करावे असे आव्हान बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.
गोरगरीब सर्वसामान्य माणसास कष्टकरी माणसास ह्याचा त्रास होत आहे ह्या संवेदनशील भावनांची मला नक्कीच जाणीव आहे तरीही कृपया सहकार्य करा याची जाणीव नक्कीच शासनाला सुद्धा आहे, आपण सर्वांनी जबाबदारी ओळखून विनाकारण बाहेर न फिरता ,व्यक्ती द्वेष ,पक्षीय राजकारण, गरीबी श्रीमंती हा भेद भाव न करता आपणास कितीही त्रास होत असला तरीही कृपया नवराष्ट्रनिर्माण करण्यासाठी, बलशाली ,वैभवशाली देश घडवण्यासाठी एका सक्षम पंतप्रधानांच्या पाठीशी आपली ताकत द्या ,विश्वास द्या, मा पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद द्या .
कोरोना संसर्ग हे मानवी अस्तित्वावर आलेले एक संकट असून भूमिपुत्रांनी कोरोना विरोधी कार्य करणाऱ्या, देव- दूत सरकारी यंत्रणेला ,पोलीस प्रशासनाला आरोग्य यंत्रणेला आपण सर्वांनी साथ द्यावी. मातृभूमीवर आलेले संकट भूमिपुत्रांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करून कोरोना व्हायरस समूळ उच्चाटन करण्यासाठी नव तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान भाजपा ज्येष्ठ नेते बालाजी बच्चेवार यांनी केले आहे◼◼
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा