०४ मे २०२०

प्रा.डॉ.जीवन चव्हाण यांची मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड


 नायगाव येथील सामाजिक राजकीय क्षेत्रातील उच्च शिक्षित युवा नेतृत्व प्रा.डॉ.जीवन पा.चव्हाण यांची मराठा सेवा संघ नायगांव तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष शामसुंदर शिंदे नायगांवकर यांनी पत्राद्वारे कळविले.आहे. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    प्रा.जीवन चव्हाण हे एक उच्चशिक्षित अभ्यासु व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण तालुक्याला परिचित आहेत. विद्यार्थी दशेपासून सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात चळवळीच्या माध्यमातून घडत गेलेले ते एक व्यक्ति आहेत..
  मागच्या दहा वर्षात त्यानी राजकीय क्षेञाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. वेगवेगळे आंदोलनात सहभागी होऊन जनतेच्या समस्या शासन दरबारी हिरीरीने मांडल्या आहेत. विद्यार्थी, शेतकरी, सामान्य जनता यांच्या प्रश्नावर ते नेहमी अभ्यासुपणे कणखरपणे विचार मांडत असतात. याशिवाय ते प्रसिद्ध वक्ते म्हणून परिचित आहेत...या सर्व बाबीचा विचार करुन प्रा.जीवन चव्हाण या तरुण अभ्यासू, वैचारिक व्यक्तिमत्वाची जाण असणारे म्हणून तालुकाध्यक्ष पदाची जवाबदारी जिल्हाध्यक्ष शामसुंदर शिंदे नायगांवकर यांनी दिली आहे.
   त्याबद्दल प्रा.जीवन चव्हाण सरांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे...
प्रा जीवन चव्हाण:यांच्या शी संपर्क साधला असता राजमाता जिजाऊ माँसाहेब, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छञपती संभाजीराजे यांचा आदर्ष नजरेसमोर ठेवून तसेच मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या विचारानुसार, राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, जिल्हाध्यक्ष शामसुंदर शिंदे नायगांवकर यांच्या आदेशानुसार आपण कार्य करणार आहोत असे प्रा.डॉ.जीवन चव्हाण यांनी  आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...