बिलोली शहरातील लिंगायत वाणी समाजातील स्मशानभूमीच्या प्रश्नावर आज दिनांक 15 जून 2020 रोजी बिलोली चे तहसीलदार विक्रम राजपूत यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात स्मशानभूमीसाठी कुंपण आणि अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
बिलोली शहरातील लिंगायत वाणी समाजाच्या स्मशानभूमीच्या प्रश्नावर 30 मे पासून अनेक बैठका घेण्यात आल्या. याच बरोबर वहिवाट असलेल्या स्मशानभूमीच्या विषयीचे निवेदन तयार करण्यात आले. या निवेदनावर जंगम समाजातील मान्यवर, सुतार समाजातील मान्यवर, फुलारी समाजातील मान्यवर, धोबी समाजातील मान्यवर ,बुरुड समाजातील मान्यवर, मातंग समाजातील मान्यवर ,लिंगायत समाजातील मान्यवर, इतर समाजातील मान्यवर, मयत झालेले आणि तेथे अंत्यविधी झालेल्या पूर्वजांची यादी , याचबरोबर मृत्यु प्रमाणपत्र जोडलेले तब्बल 25 पानाचे सविस्तर निवेदन बिलोली चे तहसीलदार विक्रम राजपूत यांना देण्यात आले . पूर्वजांच्या पुण्यतिथीदिनी तेथे कार्यक्रम करण्यासाठी मोठी अडचण येत असल्याची बाब यावेळी प्रगट करण्यात आली .ा या जागेची दप्तरी सुव्यवस्थित नोंद करून येथे संरक्षक भिंत आणि तात्पुरता निवारा बांधून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार यांच्याशी सविस्तर चर्चा ही करण्यात आली दरम्यान शहरातील मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन स्मशानभूमीच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली बिलोली चे तहसीलदार राजपूत यांनी स्मशानभूमीच्या प्रश्नावर चतुर्सिमा प्राप्त होताच पंचनामा करण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात येणार असल्याचे सांगितले. या निवेदनावर जंगम समाजातील मान्यवर पंचाक्षरी स्वामी ,शंकर आप्पास्वामी, रमेश स्वामी ,उमाकांत स्वामी ,गुरुलिंग स्वामी , काशिनाथ स्वामी, अशोक स्वामी. सुतार समाजातील मान्यवर शेषराव चौधरी, शंकर पांचाळ, वेंकट पांचाळ, गंगाधर कोसेवार. फुलारी समाजातील मान्यवर राजाराम फुलारी, संजय फुलारी, गंगाधर फुलारी .धोबी समाजातील मान्यवर लक्ष्मण हरणे, राजू हरणे ,बालाजी हरणे, कामाजी हरणे, सायलु हरणे, साईनाथ हरणे. बुरुड समाजातील मान्यवर नारायण नागेश्वर, मारुती जरकेकर, जळवा नागेश्वर, मातंग समाजातील मान्यवर हैबती जेठे ,श्रीकांत कुडके, पवन कुडकेकर ,मारुती कुडकेकर, गंगाराम कुडके, किरण कुडके, शंकर एडके, बाबू गायकवाड. यासह इतर समाजातील मान्यवरसह मुस्लिम बौद्ध, आदी धर्मातील सुद्धा मान्यवरांनी तसेच लिंगायत समाजातील पाटील, देशमुख ,मुंडकर इलेगावे, सुपारे,पटने,पावडे 294 समाज बांधवांचे निवेदन सादर करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा