बिलोली तालुक्यातील सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची तात्काळ पंचनामे करा ; संभाजी ब्रिगेडचे बालाजी पाटील शिंदे यांची मागणी
बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी ईगल, ग्रीन गोल्ड जानकी महामंडळ व सारस या कंपनीचे बियाणे विकत घेऊन त्याची पेरणी केली परंतु जवळपास सर्व शेतकऱ्यांचे पिक निघाले नसून ही बाब अत्यंत गंभीर असून आपण त्वरित आपल्या सर्व पथकासह कर्मचारी संबंधित शेतकऱ्यांना भेटी देऊन पाहणी करावी बोगस विक्री करणाऱ्या कंपणीवर ताबडतोब गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा बालाजी पाटील शिंदे यांनी दिला आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा