बिलोली. प्रतिनीधी
महान सुफी संत व मुस्लीम धर्मगुरु हजरत खाजा मोईनोदीन चिश्ती (रह.) यांचे विषयी न्युज ईन्डीया 18 टि. व्ही. चेनल चे अन्कर अमिश देवगण यानी अपशब्द बोलुन मुस्लीम धर्माच्या भावना दुखवल्या प्रकरणी बिलोली येथील मुस्लीम समाजा तर्फे कडक कारवाई करण्याची मागणी निवेदना द्वारे केली आहे.
दि.१५ जुन रोजी सांयकाळी ७-३० वाजता न्युज इन्डीया वृत्त वाहिनीवर अमिश देवगण नावाचे अन्कर डिबेट घेत असताना सुप्रसिध्द अजमेर दर्गा चे खाजा मोईनोदिन चिश्ती बध्धल खालील प्रकारचे अपशब्द वापरुन मुस्लीम समाजाचे भावना दुखावल्या आहेत. हजरत खाजा हे जगप्रसिध्द धर्मगुरु आहेत.आज ही भारतात करोडो हिन्दु- मुस्लीम बांधव त्याचें अनुनायी आहेत. एवढेच नव्हे तर देशाचे पंतप्रधान कार्यालयातुन अजमेर दर्गाला फुलांची चादर दरवर्षी पाठवली जाते. लाकडाउन च्या काळात महान सुफी संताची बदनामी करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा मुध्धाम कट कारस्थान केले आहे. अन्कर देवगण च्या कुटील कारस्थाना चा सर्व थरातुन निषेध होत असुन.
बेअकली अन्कर अमिश देवगण जाणुन बुजुन टिप्पणी केले आसुन त्वरीत अटक करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बिलोली येथील अल्पसंख्याक सेल चे तालुका अध्यक्ष शेख सुलेमान सेठ, नगरसेवक जावेद कुरेशी, समतादुत ईशाद मौलाना ,एकबाल ईनामदार, आ.रहीम कुरेशी ,संदिप कटारे, मुखीद कुरेशी, बाबा कुरेशी ,रशीद आ. खादर कुरेशी यानी आपल्या स्वाक्षरीने तहसिलदार विक्रम राजपूत, पोलीस निरिक्षक व उपविभागीय अधिकारी याना निवेदन दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा