२६ जुलै २०२०

साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वताची काळजी घेणे गरजेचे; डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक भोकर



भोकर-  भोकर शहर आणि परिसरातील कोरोना साथीची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक  होत आहे. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग, पोलीस, नगर परिषद, पत्रकार,मिडिया आणि सेवाभावी संस्थांनी आजपर्यंत केलेले प्रयत्न  प्रशंसनीय आहेत. रुग्णसंख्या जवळपास ७ झाली असून १ रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ४ महिन्यापासून  सर्वजण चिंताग्रस्त आणि भयभीत झाले आहेत. साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वताची काळजी घेणे गरजेचे; डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक भोकर
     खालील बाबींवर सर्वांनी गंभीर विचार करून कृती करणे गरजेचे आहे असे मला वाटते.
१-अन्न, पाणी या  प्रमाणे मास्क ही सुद्धा जीवनावश्यक बाब आहे. Sanitizer-Mask-Social distancing(SMS) या त्रिसूत्रीस पर्याय नाही. नाकातोंडावर मास्क असल्याशिवाय दवाखाना, दुकाने, कार्यालये आदि ठिकाणी प्रवेश व सेवा मिळणार नाही अशी कडक भूमिका घ्यावी.
    मास्क हाच टास्क असला पाहिजे.
२- प्रत्येक व्यावसायिकाने (डॉक्टर्स सर्व व्यापारी, कार्यालये,आडत इ.)  आपल्या कर्मचार्यांना मास्क, फेस शिल्ड, ग्लोव्हज व  sanitizer पुरवठा करून वापरणे बंधनकारक केल्यास  कर्मचारी, ते स्वतः आणि कुटुंबं सुरक्षित होतील. यासाठी जास्त खर्च येणार नाही.
३-घरातील जेष्ठ मंडळी, मुले आणि गरोदर माता यांची विशेष काळजी प्रत्येक कुटुंबात घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण यांना आजार झाल्यास गंभीर होण्याची दाट शक्यता असते.  शक्य झाल्यास घरातच त्यांचे सन्मानजनक विलगीकरण करावे.
४. कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अनेकजण Quarantine  आणि व्यावसायिक दुष्परिणाम या भितीपोटी घरीच राहतात व संसर्ग वाढत जातो.
५ - कोरोना झालेल्या रुग्णांना समाजात दुय्यम  वागणूक दिली जाते ही खेदजनक बाब आहे. हा एक विषाणूजन्य आजार असून तो कोणत्याही व्यक्तीस होऊ शकतो. या भितीपोटी अनेकजण वैद्यकीय सल्ला घेत नाहीत.
६ - आरोग्य यंत्रणेला  ( शासकीय आणि खाजगी) सहकार्य केले तरच प्रसार रोखता येईल. खाजगी डॉक्टरांनी कोरोना सदृश रुग्णांची माहिती त्यांच्या फोन नंबरसह तालुका वैद्यकीय अधिकारी यांना कळविणे बंधनकारक आहे व त्यामुळे रुग्णांना शोधून योग्य उपचार आणि Quarantine  करता येईल.
७- शहरात सातत्याने निर्जंतुकीकरण होणे गरजेचे वाटते.
८- अंत्यविधी व इतर गर्दीच्या ठिकाणी जास्त धोका संभवतो म्हणून अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. Lockdown  संपल्यावर शहरात होत असलेली गर्दी मुंबईस ही मागे टाकणारी असून अत्यंत चिंताजनक आहे.
९- शहरात आणि प्रत्येक गावात
सेवाभावी वृत्तीचे अनेक कार्यकर्ते असतात. हे *आरोग्य मित्र* पुढे आल्यास अनेकांचे योग्य समुपदेशन होईल व रुग्ण  वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी पुढे येतील.यांचा योग्य सन्मान व्हावा.
१०- शहरात प्रभागनिहाय
 ताप आणि इतर लक्षणांसाठी नियमित सर्व्हे  चालु आहे तसेच रक्तदाब, मधुमेह आणि इतर गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी नियमित उपचार घ्यावा व वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
१२- Covid Swab testing साठी दिलेल्या  नागरिकांना रिपोर्ट येईपर्यंत घरी Quarantine राहणे बंधनकारक आहे.
१२- अनेक कुटुंबात मधुमेह, रक्तदाब पहाण्यासाठी मशीन असतात.  Thermal Gun  आणि पल्स Oxymeter   या मशीन ज्यांना शक्य आहे त्यांनी वापरल्यास रुग्ण  ओळखणे सोपे होईल. ही साधने स्वस्त आहेत व सहज वापरता येतात.
१३-प्रदीर्घ *Lockdown*  मुळे होणारे *Mental Breakdown* टाळण्यासाठी योग, सुदर्शन क्रिया, ध्यान धारणा याचा आधार घेतल्यास तणाव बराचसा कमी होईल. योग चळवळी शहरात नियमित चालू आहेत.
१४- *फायदा, वायदा आणि कायदा* या तत्वांवर आपला समाज चालतो. कायद्याचा वापर करणारी यंत्रणा ही हतबल झाली आहे. दंडात्मक कार्यवाहीची वेळ येणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे कारण *Prevention is better than Cure. Lockdown हा काही रामबाण उपाय होऊ शकत नाही. कायदे में रहोगे तो फायदे मे रहोगे*
१६- कोरोना संदर्भात अफवा पसरवू नये. ९५ टक्के रुग्ण बरे होतात व नवनवीन औषधे उपलब्ध होत आहेत.
१६- *Teach one each one*  आणि सामुहिक जबाबदारी स्विकारून कृती केल्याशिवाय ही साथ नियंत्रणात येणार नाही.
१७- *मीच माझा रक्षक* हा भाव जागृत ठेवून वर्तन केल्याशिवाय ही साथ नियंत्रणात येणारच नाही.
१८- शासनाचे निर्देश पाळून स्वतःला, कुटुंबाला आणि समाजाला सुरक्षित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे कारण या  साथीमुळे होणारे शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान  भयंकर आहे. *या साथरोग नियंत्रणासाठी  आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे व ती जबाबदारी व कर्तव्य समजून पार पाडले तरच या आजारावर नियंत्रण आणू शकतो*

- डॉ अशोक मुंडे, वैद्यकीय अधिक्षक,
सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक ग्रामीण रुग्णालय भोकर.

1 टिप्पणी:

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...