कुंडलवाडी प्रतिनिधी
शाळेत भौतीक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहे.पण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण द्यावे.तसेच विद्यार्थी संख्या व गुणवंता वाढविण्यासाठी प्रयत्नशिल राहावे असे दि.27 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद हायस्कूल उर्दू/मराठी माध्यम येथे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान अंतर्गत नुतन ईमारत बांधकाम भुमी पुजन सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार निमित्त आयोजित कार्यक्रमात जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड प्रतीपादन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरपरिषद अध्यक्ष प्रतिनिधी किशन चिनन्ना कुडमूलवार,सेवानिवृत्त केंद्रीय उत्पादशुल्क तथा सीमाशुल्क उपायुक्त,उदघाटक लक्ष्मणराव ठक्करवार अरळी जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण समिती सदस्य जि.प.नांदेड,प्रमुख पाहुणे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन साईनाथ गोविंदू उत्तरवार,पंचायत समितीचे सदस्य दत्तराम बोधने,गटशिक्षणाधिकारी हमिद दौलताबादी,
नगरसेवक पंढरी पुपलवार,व्यंकट शिरामे,शेख मुखत्तार खाजामियाॅ,पोशट्टी पडकुटलावार,मारोती राहीरे तालूक सरचिटणीस भाजप,शैलेश पाटील चिंचाळकर तालूका युवा उपाध्यक्ष भाजप,श्रीनिवास दम्यावार,मारोती कोलमवार,राजेश खळबाळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ठक्करवाड म्हणाले शाळेचा विकासासाठी सर्वात जास्त शाळेचे व्यवस्थापण समिती अध्यक्ष आमचे मित्र मोहम्मद अफजल प्रयत्नशिल असून ते मला दोन दिवसातून किमान एकदातरी शाळेतील विविध विकासासाठी फोन लावत असतात म्हणूनच मी अरळी जिल्हा परिषद सराकल सदस्य असून कुंडलवाडी शहरातील उर्दू शाळेचा सुरक्षाभिंत बांधकामासाठी मागील काळात दहा लाखाचा निधी दिला अनेक जन चकीत झाले.याठिकाणी माझे कौतूक करण्यात आहे.जातपात अलिकडचा काळात तैयार करण्यात आले.आम्ही जनतेचा मताने मोठे झालो.आज या पदावर आहेत.आम्हाला जिवंत ठेवण्याचे काम या भागातील जनतेने केले.या ठिकाणी शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष आमचे मित्र मोहम्मद अफजल शाळेतील प्रलंबित प्रशन सोडण्याची मागणी केली.येणा-यात काळा शिल्लक सुरक्षाभिंत काम पुर्ण करण्यात येईल.रिक्त शिक्षकांचीपदे भरण्यासाठी व उर्दू माध्यम नववी,दहावी तुकडी वाढसाठी प्रयत्न करू.असे आश्वासन ठक्करवाड दिले.
प्रस्तावीक पर भाषणात शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष मोहम्मद अफजल हाजी मो.इब्राहिम यांनी जिल्हा परिषद हायस्कूलचे मागील दिवस पुन्हा आणण्यासाठी आम्ही मुख्याध्यापक शिक्षक प्रयत्न शिल आहे.तसेच शिल्लक सुरक्षाभिंत काम पुर्ण करण्यात यावे.रिक्त शिक्षकांचीपदे भरण्यात यावे व उर्दू माध्यम नववी,दहावी तुकडी वाढकरून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची सोय करण्यात यावे अशी मागणी केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दहावी बोर्ड परक्षेत जिल्हा परिषद हायस्कूल शाळेचा निकाल 83% लागला यासाठी प्रयत्न केलेले विद्यालयातचे मुख्याध्यापक डी.पी.शेट्टीवार,सह शिक्षक एस. डी.कवठाणे यांच्यासह व हायस्कूल मधून सर्व प्रथम आलेला विद्यार्थी वगशट्टे लोकेश शिवराज व सर्व द्वितीय आलेला शेख आसिफ हाजी यांचा सत्कार करण्यात आले.
यावेळी शाळेचा वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आहे.
नुतन ईमारत बांधकाम भुमी पुजन लक्ष्मणराव ठक्करवार अरळी जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण समिती सदस्य नांदेड यांच्या हस्ते व किशन चिनन्ना कुडमूलवार,सेवानिवृत्त केंद्रीय उत्पादशुल्क तथा सीमाशुल्क उपायुक्त यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक डी.पी.शेट्टीवार तर आभार व्य.स.अध्यक्ष मोहम्मद अफजल मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष मोहम्मद अफजल,उपाध्यक्ष सय्यद फारूख पट्टेदार, एस.डी कमठाणे सर,जियाओदीन ईरफान सर,जुबेर सर,अनवरी मॅडम,दिलशाद मॅडम,राजू बोधनकर आदींनी परिश्रम घेतले.
__________________________
चौकीटीत घ्या.
किशन कुडमूलवार अध्यक्षीय समारोपात म्हणाले नांदेड जिल्हातील 70 जिल्हा परिषद हायस्कूल पैकी नावरूपात फक्त पाच ते सात हायस्कूल असल्याचे बोलले जाते.मी याच शाळेचा विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेतीलचे मागील गुणवत्ता,पुन्हा मिळविण्यासाठी हायस्कूल चा गुणवंतेचा आलेख वाढविण्यासाठी शिक्षकांनी खाजगी शाळे सोबत स्पर्धाकरणे आवश्यक,खाजगी शाळे प्रमाणे आपली गुणवंत वाढवली पाहीजे शाळेतील विद्यार्थी संख्या वाढदिवसाठी विद्यार्थ्यांचा घरी पालकांना जावून भेट घेतली पाहीजे विद्यार्थ्यांना शाळेत आनले पाहीजे.शाळेतील रिझल्ट वाढवीले पाहीजे म्हणजे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असे ते म्हणाले.
__________
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा