कुंडलवाडी (मोहम्मद अफजल) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांनी शहरातील शतरंजीगल्ली राहणारे जेष्ठ नागरीक नजीर मैलाना पठाण यांच्यावर योग्य उपाचार करून चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा देवून त्यांचे आरोग्य आबाधीत ठेवले याबद्दल रूग्ण तथा जेष्ठ नागरीक नजीर मैलाना पठाण वय 55 वर्ष यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास स्लाईन बॅक्स निडल्स भेटदेवून डाॅ.बालाजी सातमवाड यांचा शाल श्रीफळ देवून,पेढेचारून यथोचित सत्कार केले.यावेळी त्यांचे लाहान बंधू इसाक मौलाना पठाण,मुलगा जलील नजीर पठाण,रूग्णालयातील औषध निर्माता अधिकारी,आरोग्य साह्यक ए.एच मुंढे,अदी उपस्थित होते.
याबाबत माहिती अशी की शहरातील शतरंजीगल्ली राहणारे जेष्ठ नागरीक नजीर मैलाना पठाण वय 55 वर्ष यांच्या डाव्यापायास दुचाकीने दुखापत होवून मोठ्या प्रमाणात जख्म झाले होते.त्या पायास मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन होवून सुज आले व त्यांचे आरोग्य दिवसे दिवस खालावत चालले असे.या कोरोनाचा काळा या छोट्याशा जख्मेचे एवडे मोठे रूप झाले अता मी वाचणार की नाही अशी त्या रूग्णाची समज झाली होती.
नांदेड येथे उपचार घेतले तर मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च होईल व आरोग्य सुधरेल की नाही ते दुविधा मनस्थित होते.यात ते प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले व सर्व हकीकत वैद्यकीय अधिकारी डाॅ.सातमवाड यांना सागीतले गेल्या आठ दिवसा पासून त्यांचावर उपचार झाले.आता त्यांची तबीयत 75% सुधरली त्यांना समाधान वाटत आहे. डाॅ.सातमवाड साहेब योग्य उपाचार करून चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा दिले म्हणून मी वाचलो.माझे आरोग्य आबाधीत आहे.असे रूग्ण जेष्ठ नागरीक नजीर मैलाना पठाण यांनी बोलून दाखवीले.म्हणून त्यांनी स्वखुशीने आरोग्य केंद्रास स्लाईन बॅक्स निडल्स भेट देवून डाॅ.बालाजी सातमवाड यांचा शाल श्रीफळ देवून यथोचित सत्कार करून पेढे वाटप केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा