कुंडलवाडी (मोहम्मद अफजल )
दि.27 ऑगस्ट रोजी शहरातील त्या बाधीत रूग्णांचा संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटूंबातील तीन व्यक्ती पाॅझिटीव्ह तसेच नांदेड हुन एक व्यक्ती शहरात पाॅझिटीव्ह दाखल झाला यावरून कुंडलवाडी येथील कोरोना पाॅझिटिव्ह संख्या आठवर पोहचली अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी सातमवाड यांनी सागीतले.
दि.27 ऑगस्ट रोजी 14 व्यक्तींचे
व्यक्तींचे आरोग्य चाचणी करण्यात आली असता शहरातील त्या बाधीत रूग्णांचा संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटूंबातील त्याची आई व दोन मुले असे एकंदरीत तीन नातेवाईकांचे अहवाल पाॅझिटीव्ह निघाले.
तसेच शहरात एक व्यक्ती नांदेड हुन पाॅझिटीव्ह दाखल झाला.असून आज त्यांच्या परीवारातील व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.सातमवाड सागीतले.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी रूग्ण राहात असलेल्या गल्ली काॅन्टेन्टमेन्ट झोन म्हणून जाहीर करून परीसर सील केले व नागरीकाचा प्रवेश बंदी करण्यात आले आहे.
या अनुषंगाने शहरातील सर्वच बॅंका सोमवार पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.
तरी शहरातील नागरीकांनी शहरातील वाढती कोरोना रूग्ण संख्या लक्षात घेवून कोरोना 19 नियमाचे कडक पालन करावे.शोषल डिस्टन्स,मास्क चा वापर करावे.आवश्यक कामा शिवाय घरा बाहेर पडूनका,स्वताची व आपल्या परिवाराची आरोग्याची काळजी घ्या.असे अहवान केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा