लोहगाव:
वसुंधरारत्न, परम त्यागी,सर्वांचे श्रद्धास्थान, राष्ट्रसंत प.पु.डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचे काल दुपारी शिवैक्य झाले. या अतिशय दु:खद क्षणी लोहगाव ग्रामस्थांच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी नागेश मुकदम यांनी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांंचा जीवनपरीचय उपस्थितांना करुन दिले.महराजांचा जन्म 25 फेब्रुवारी 1917 रोजी झाला असून ,ते संस्कृत भाषेचे ज्ञानी होते.1939 मध्ये त्यांनी काशी मठाचा कार्यभार सांभळले.त्यानंतर 1943-1944 या काळात पंजाब प्रांतात राष्ट्रीय स्वंयसंघामध्ये संघप्रमुख गोळवकर गुरुजीबरोबर कार्य केले.1945 मध्ये महाराजांनी लाहोर विद्यापीठातून एम.बी.बी.एस.पूर्ण केले.1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यामुळे महाराजांना दोन वेळा तुरुंगवास देखील भोगावा लागला. त्यानंतर 1955 त्यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र कपीलधार पदयात्रेस प्रारंभ केले.दरवर्षी लाखो भक्तगण यात्रेला जातात.त्यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य,वृक्ष सवंर्धन,जल सवंर्धन,समाज प्रबोधनाचे महान कार्य केले.त्याचबरोबर विज्ञान व आध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालून मानव कल्याणाच्या पूर्ण उत्कर्षासाठी अविरत कार्य करत राहीले.त्यांच्या महान कार्यामुळे संबंध भक्तांसाठी राष्ट्रसंत झाले. वयाच्या 104 थ्या वर्षी महाराजांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर रात्री शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने भक्तगणांची व राष्ट्राची प्रचंड हानी झाली आहे.
यावेळी लोहगाव ग्रामस्थांच्या वतीने महान राष्ट्रसंतास दोन मिनिटे मौन राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सरपंच प्रतिनिधी उत्तम उमरे,शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी पा.बुड्डे,बिलोली उपनगराध्यक्ष मारोती पटाईत, शिवा विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष मनोहर वसमते,दत्ता पा.पांढरे, दिलीप पा.पांढरे,दत्ता टेंभुर्णीकर,प्रकाश पा.वानोळे,आप्पाराव पा.मुस्तापुरे,रमेश पा.शेटकर,शरद स्वामी,प्रा.यादव कोरनुळे, मच्छिंद्र कांबळे,नागनाथ शेटकर,राजेश्वर लघुळे,शिवाजी शेटकर,दत्ता शेटकर,दिगांबर काचमोडे,उमाकांत शेटकर,व्यकट पाटील कुरे, रमेश लघुळे, मारोती वसमते,कैलास वसमते,भगवान हांडे,मारोती शेटकर,गजानन शेटकर, संतोष स्वामी,अनिल गोस्वामी आदीं ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा