UGC च्या निर्दशानुसार 100% प्राध्यापक भरती सुरु करा व 200 बिंदु आरक्षण उच्च शिक्षण विभागात लागु करण्यासाठी नायगाव तहसिलदार यांच्या कडे नेट-सेट -पीएचडी धारक संघर्ष समिती नायगाव ची मागणी
महाराष्ट्र शासनाकडून दहा वर्षे अशासकीय अनुदानित महाविद्यालय व विद्यापिठामधे सहाय्यक प्राध्यापक भरती सुरळीत चालू नाही. त्यामुळे राज्यात जवळपास 12000 सहाय्यक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. याचा राज्याच्या उच्च शिक्षणावर विपरीत परिणाम झाला असून उच्च शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या व प्राध्यापकांची घटती संख्या हे व्यस्त प्रमाण शिक्षण क्षेत्रात नक्कीच शोभणीय नाही. तसेच महाराष्ट्र राज्यात उच्च शिक्षण घेणारे, संशोधन करून पिएचडी प्राप्त करणारे, नेट-सेट पाञता परीक्षा पास केलेले सुशिक्षित बेरोजगार यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या उच्च शिक्षित तरुणांना उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही त्यामुळे हे तरुण मानसिक तणावाखाली जीवन जगत आहेत. त्यांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जीवन अस्थिर बनले आहे...
यासाठी सरकारने प्राध्यापक भरती लवकर सुरू करावी व उच्च शिक्षित युवकांना न्याय द्यावा याकरीता नेट-सेट-पिएचडी धारक संघर्ष समितीने संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी "तालुकास्तरीय मिशन निवेदन" हा कार्यक्रम घोषित केला.. त्याचाच एक भाग म्हणून मा. तहसिलदार नायगांव जि. नांदेड यांना निवेदन देतांना डॉ.जीवन चव्हाण, प्रा.गायकवाड पि.सी, व प्रा.गायकवाड पि. एन. दिसत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा