ओला दुष्काळ जाहीर करा व पीक विमा लागू करा
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हे नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी भागांची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर होते. त्याचा सोबत माजी आमदार सुभाष साबणे होते.
नांदेड वरून मुखेड कडे जात असताना मांजरम शिवराच्या परिसरात रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कृषीमंत्री दादा भुसे यांना निवेदन देऊन नायगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा व खरीब हंगामासाठी पीक लागू करा अशी मागणी केली.
पांडुरंग शिंदे निवेदनात म्हटले की, नांदेड जिल्ह्यात विशेषता नायगाव तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे शेतीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोगस सोयाबीन पिकाची भरपाई अद्याप शेतकऱ्याला मिळाली नाही. शेतकऱ्यांनी दुबार- तिबार सोयाबीन पिकाची पेरणी केली. कापणीला आलेले सोयाबीन अतिवृष्टीमुळे वाया गेले आहे.
यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे मुग, उडीत, सोयाबीन, कापूस, तुर, मका या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वे करण्यात व पंचनामे करण्यात वेळ न दवडता शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी आणि यावर्षीच्या खरीप हंगामाचा पिक विमा लागू करावा.
यावेळी रवींद्र भिलवंडे (तालुका अध्यक्ष शिवसेना),शिवाजी शिंदे,विकास भरे, माधव गायकवाड, राहुल शिंदे, शिवाजी गायकवाड,विश्वनाथ शिंदे, बालाजी मा.पाटील,दत्ता पेरके, परमेश्वर केते,उत्तम कर्णे,व्यंकट शिंदे अनेक शेतकरी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा