०७ सप्टेंबर २०२०

कुंडलवाडी शहरातील नऊ तर परिसरातील दहा कोरोना पाॅझिटीव्ह

.

कुंडलवाडी  (मोहम्मद अफजल )
दि.7 सप्टेंबर रोजी कुंडलवाडी व परिसरातील हरनाळी व टाकळी येथील एकंदरीत 75 रूग्णांची अॅटिजेन्ट रॅपिड चाचणी केली असता कुंडलवाडी शहरातील 10 रूग्ण तर परिसरातील हरनाळी येथील 8 रूग्ण व टाकळी येथील 1 रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह निघाले.सबंधी रूग्ण बिलोली कोविड सेंटर येथे उपचार घेत आहेत. 
दि.7 सप्टेंबर रोजी बिलोली कोविड सेंटर येथील कार्यरत अॅटिजेन्ट चाचणी पथकांनी कुंडलवाडी शहरातील एकूण 47 रूग्णांची तपासणी केली असता त्यापैकी 10 रूग्ण पाॅझिटिव्ह निघाले.तर हरनाळी येथील एकूण 16 रूग्णांची तपासणी केली असता त्यापैकी 10 रूग्ण पाॅझिटिव्ह निघाले.तसेच टाकळी येथे 12 रूग्णांची आरोग्य तपासणी केली असता यात 3 रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह निघाले.तर यातीन पैकी 1 कुडलवाडी व एक हरनाळी येथील रूग्णाचा समावेश असल्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांनी दिली.
घेण्यात आलेल्या अॅटिजन रॅपिड टेस्ट पथकात पथक प्रमुक कटके एच.आर लाॅब टेक्निशीयन शेख वाय.वाय,शेख ए.ए,गौंड सी.जे,पवार के.एम,चालक मुजीब भाई,कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुपरवायझर जाधव आदींचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...