covid-19 च्या कामासाठी सेवा अधिग्रहित केलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यासाठी भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने गट शिक्षण अधिकारी बिलोली यांना निवेदन द्वारे मागणी
बिलोली (सुनिल कदम) देशभरात कोरणा मुळे अनेक शाळे मधिल शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा स्थानिक शासनाने अधिग्रहित केलेल्या आहेत, त्यानुसार अनेक क्षेत्रात शिक्षक कार्यरत आहेत, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले पण शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नसल्या तरी संदर्भ परिपत्रकांमध्ये काही शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले असून ,त्या शिक्षकांना शाळेत बोलावून ऑनलाईन प्रशिक्षण प्रक्रियेत उपयोग करून घ्यावा असे निर्देश दि. 24 जून च्या परिपत्रकातील मुद्दा क्रमांक 1.4 अन्वये संबंधीत शिक्षण अधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क करून covid-19 च्या कामासाठी सेवा अधिग्रहित केलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून त्या अनुषंगाने भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने श्री हावगीराव गोपछडे (जिल्हा संयोजक नांदेड) यांनी गटशिक्षणाधिकारी बिलोली यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधीचे निवेदन दिले व आशा कोवीड- 19 कार्यात अधिग्रहित असलेल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना निवेदनाद्वारे व तोंडी दिल्या व निवे...