प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस केदार पाटील साळुंके यांनी आरळी येथील कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले
आरळीतील शेतकरी पिता- पुत्राचा पुरात वाहून मृत्यूने परिसर हळहळला बिलोली:- बिलोली तालुक्यातील आरळी येथिल शेतकरी शादुल मेहबूब शेख वय 40 वर्ष व त्यांचा मुलगा मेहराज शादुल शेख वय सोळा वर्ष 28 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता शेताकडे सोयाबीन भिजत असल्याने झाकण्यासाठी गेले परत घराकडे येत असताना नाल्यास मोठा पूर आला तो ओलांडताना दोघांचाही पाण्यात वाहून मृत्यू झाला त्यांचा मृतदेह सायंकाळी चार वाजता मिळून आला त्यांचा अंत्यविधी 29 ऑक्टोंबर रोजी बारा वाजता करण्यात आला असून त्या घटनेने परिसर हळहळला आहे. आरळी शिवारातून जिगळा तळ्यावरुन मोठा नाला वाहत पुढे गोदावरी नदीला जातो शेतकरी पाणी कमी असल्याने नाला ओलांडून शेताकडे नेहमी ये-जा करत असतात मात्र यंदा मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस व जीगळा येथील तळ्यातून अचानक मोठा जलप्रवाह वाहून आला त्यातच पाण्याचा अंदाज न आल्याने आरळी येथील अल्पभूधारक शेतकरी शादुल मेहबूब शेख हे शेताकडे सोयाबीन भिजत असल्याने झाकण्यासाठी आपला दहावीत शिकणारा मुलगा मेहराज शेख यास मदतीस घेऊन शेताकडे गेले परत घराकडे येत असताना त्यांनी आपले बैल पाण्यातून कडेला आणून...