माजी विद्यार्थी मित्रमैत्रिणी स्नेहसंमेलन उत्साहात साजरे २५ वर्षांनी सर्व मित्र मैत्रीणीना एकत्र भेटण्याचा योग
नांदेड- यशवंत कॉलेज उमरी व नुतन काॅलेज उमरी येथिल सन १९९४ दहावी बॅच आणि १९९६ बारावी बॅच संयुक्त विद्यमाने मित्रमैत्रिण यांच्या वतीने नांदेड हाॅटेल सिटी प्राईड येथे दि.२५ डिसेंबर रोजी दिवसभरात अगदी आनंदी वातावरणात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळ च्या सत्रात शिक्षकांना आमंत्रित करुन त्यांचा यथोचित सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला व त्यांनी माजी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शनपर मनोगतातून या स्नेहसमेलनाचे आयोजनाचे भरभरून कौतुक केले व भुतकाळातील शालेय जिवनातील विविध घटनांचा उजाळा दिला.प्रत्येकांनी आपले बालपणीच्या आठवणीत हरवून गेले.यावेळी मंचावर उपस्थित मा.सोपानराव लामकानीकर सर,मा.आत्तार सर,मा.बि.ए.जाधव सर ,मा.एम.एस.कदम सर,मा.वाडकर सर ,मा.एन.बी.कदम सर,मा.एन.एन.मोरे सर, मा.व्ही.डी.देशमुख सर, मा.किरण मोरे सर, मा. सुरंगळीकर सर आदींनी मार्गदर्शन केले.उपस्थित सर्व मित्र मैत्रीणीने परिचय व मनोगतातून आपलेपणाने परिवारीक भुतकाळ व वर्तमान बदल विविध पैलू चे मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या, कोणी डॉक्टर, इंजिनिअर,शिक्षक,प्राध्यापक, राजकीय, सामाजिक, व्यापारी, पत्रकार, शेतकरी आश...