मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती घरात साजरी करा - गोविंद मुदगुरे आळंदीकर

बिलोली ;-            पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९५ वी जयंती ३१ मे रोजी सर्वञ साजरी केली जाणार असुन लॉकडाऊनमुळे बिलोली तालूक्यासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी कोरोना च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गर्दी होऊ न या उद्देशाने कोरोनाच्या संकटामुळे सार्वञिक जयंत्या रद्द करण्यात आले असुन शासनाच्या आदेशान्वे घराघरात मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आवाहन मल्हार नेते गोविंद मुदगुरे आळंदीकर यांनी केले आहे.   बिलोली तालुक्यातील नागरीकांनी ३१ मे रोजी वेळी १० वाजेच्या दरम्यान आपल्या घरासमोर रांगोळी काढून, घरांवर पिवळा ध्वज उभारुन आपल्या सर्व परिवारासह पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती करावी.पुष्पहारासाठी घरी फुले उपलब्ध असल्यास तयार करा अन्यथा हार आणण्यासाठी बाहेर जाऊ नका असेही सांगण्यात आले.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लाॅकडाऊन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणारी सार्वञिक होळकर जयंती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील समाज बांधवांनी या आव्हानाचे पालन करुन सर्वांनी घराघरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना...

कासराळी येथील मठाधिपती श्री.ष.भ्र.१०८ निळकंठेश्वर शिवाचार्य महाराज यांना सरंक्षण द्या गावक-यांची मागणी

बिलोली (ता.प्र )तालूक्यातील मौजे कासराळी येथील खाकेश्वर मठसंस्थान ट्रस्ट अध्यक्ष  मठाधिपती श्री.ष.भ्र.१०८ निळकंठेश्वर शिवाचार्य महाराज यांना सरंक्षण द्या अशी मागणी कासराळी येथील   गावक-यांच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन द्वारे मागणी केली आहे . काही दिवसाखाली उमरी तालूक्यातील नागठाणा येथे मठातील साधुची हत्या झाली त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करुन महाराज अस्थिर झाले आहे.धोक्याचे अंदाज बांधुन पोलीस विभागाच्या वतीने महाराज यांना शस्त्रसह पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन आज दि.30 मे रोजी  बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांना देण्यात आले. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष मठाधिपती श्री.ष.भ्र 108 निळकंठेश्वर शिवाचार्य महाराज,डॉ.के.बी कासराळीकर, गंगाराम चरकुलवार, संग्राम हायगले, इंद्रजीत तुडमे, विशोक चंचलवार  ,राजु पा.शिंपाळकर, सय्यद रियाज, दिपक गंगाधर संदलोड, माजीद शेख,लक्ष्मण फुलारी,अदि जन उपस्थित होते.

मा .बालाजी बच्चेवार एक झंजावात प्रेरणादायी विनम्र नेतृत्व- साईप्रसाद कदम जुनीकर

 नायगाव विधानसभा कार्यक्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नेते मा बालाजी बच्चेवार साहेब एक झंजावात प्रेरणादायी विनम्र नेतृत्व आदर्श व्यक्तिमत्व आहे.        भाजपा हा शिस्तप्रिय पक्ष लोकाभिमुख करण्यासाठी ज्यांनी आयुष्याची तीस वर्षे खर्ची घातली नायगाव बिलोलीचा राजकारणात घराणेशाही मोडून काढून एक दबदबा निर्माण करून वैशिष्ट्यपूर्ण कामाचा ठसा उमटवला निष्कलंकीत, निश्चयाचा महामेरू बच्चेवार साहेब एक झांजावात प्रेरणादायी विनम्र नेतृत्व . अशा आजातशत्रू, विनयशील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!  आपले योगदान आपला अन्यायाविरुद्धचा बुलंद आवाज आम्हा नवतरुण कार्यकर्त्यांना नक्कीच प्रेरणादायी आहे आपलं विनयशील नेतृत्व हेच आम्हाला सदैव मार्गदर्शक असणार आहे  आपण नायगाव विधानसभा मतदार संघात मन ,मस्तक आणि, मनगटाच्या बळावर अठरापगड समाजाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने नायगाव, बिलोली  तालुक्यात भाजपची मुहूर्तमेढ रोवली.  आज नायगाव  विधानसभा क्षेत्रात नावारूपाला आलेली भाजपा तुमच्यासारख्या भूमिपुत्रांचा त्त्याग आणि त्यांच्या समर्पित जीवन...

बिलोली तालुक्यातील केरूर येथील एकास कोरोनाची लागण

न.प येथे स्थापन केलेल्या सी.सी.सी केंद्रात उपचार सुरू  .... बसवंत मुंडकर बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथुन जवळच असलेल्या केरूर येथील एका रूग्णाचा कोरोना रिपोर्ट पाँझीटिव्ह आला आहे.सदर रूग्णावर बिलोली नगर परिषदेच्या इमारतीत स्थापन करण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.दोन महिन्याच्या अवधिनंतर तालुक्यात कोरोनाचा पाँझिटीव्ह रूग्ण आढळून आला आहे.प्रशासनाच्या वतीने सयंम बाळगण्याचे अवाहन करण्यात येत आहे. काही दिवसांपुर्वी हैद्राबादहून नांदेड येथे आलेल्या एका व्यक्तीने नांदेड येथील लंगर परिसरात काही काळ व्यथित केला.त्यानंतर नांदेड हून नरसी पर्यंत तीनचाकी अँटोने व नरसी हून बिलोली पर्यंत ट्रक ने प्रवास केलेल्या सदर व्यक्तीस कोरोना सदृष लक्षणे आढळून आल्याने सदर रूग्णास बिलोलीच्या सी.सी.सी केंद्रात दाखल करून त्याची चाचणी करण्यात आली.प्रथम घेण्यात आलेल्या चाचणीत सदर रूग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला होता.माञ लंगर परिसरातील काही व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आल्याने व आपणासही तशीच लक्षणे दिसत असल्यामुळे त्या रूग्णाने स्वतच पुन्हा चाचणी करण्याची मागणी केली होती.रूग्णाच्...

बिलोली शहराजवळील विजयनगरचा कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची पणन विभागाला विनंती करणार. - कृषीमंञी दादाजी भिसे

बिलोली       तालुक्यातील दगडापुर (विजयनगर)  येथील बंद करण्यात आलेले कापूस खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी आपण स्वत पणन विभागाला विनंती करणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंञी ना.दादाजी भिसे यांनी दुरध्वनी द्वारे दिली.ते बिलोली येथील प्रश्न सिमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक तथा पञकार गोविंद मुंडकर यांच्याशी बोलत होते.     दिवस राञ शेतात राबराब राबून धान्य पिकविणा-या शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा यासाठी शासनाने हमी भावात शेत माल खरेदी केंद्रे सुरू केली होती.बिलोली तालुक्यातही इतर शेत माला प्रमाणे कापूसाची हमी भावात खरेदी करण्यासाठी तालुक्यातील विजय नगर येथील जिनींग मध्ये हमी भाव खरेदी केंद्र सुरू केले होते.हमी भावात कापूस विक्री करण्यासाठी तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची आँनलाईन नोंदणीही केली होती.पिकांची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी काहीच शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यानंतर येथील हमी भाव खरेदी केंद्राने काही कारणास्तव कापसाची खरेदी बंद केली.विजयनगर येथील खरेदी केंद्राच्या भरोषावर बसलेल्या शेतकऱ्यांना जिनिंग च्या या निर्णयामुळे मोठ...

"आत्मनिर्भर" दिलासा पँकेजमध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी राहुल साळवे यांची पंतप्रधानांकडे मागणी

जिल्हा प्रतिनिधी :- सध्या कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लाँकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे या लाँकडाऊनमुळे निर्माण झालेली आर्थिक टंचाई आणि ऊपासमारी यावर ऊपाययोजणा करत केंद्र सरकार कडुन या 56 दिवसात 20.97 लाख करोड रूपयांची दिलासा पँकेज दिले असल्याचे तसेच यातील 11 लाख करोड रूपयांची घोषणा या 5 दिवसात 5 प्रेस काँन्फरंन्स घेऊन केंद्रिय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली आहे यामध्ये एकुण 51 घोषणा करण्यात आल्या आहेत आणि त्यासाठी 11.02 लाख करोड रूपयांची घोषणा करण्यात आली आहे तसेच 22 मार्च ते 22 में पर्यंत केंद्र सरकारच्या विविध घोषणांमध्ये 1.92 लाख करोड रूपयांची घोषणा झाली त्यात आरबीआयचे महत्वाचे पाऊल म्हणुन 8 लाख करोड रूपये एवढे असुन अशा प्रकारे एकुण 20.97 लाख करोड रूपयाच्या "आत्मनिर्भर" भारत दिलासा पँकेजची घोषणा करण्यात आली आहे परंतु या घोषणांमध्ये ज्यांना आत्मनिर्भर बनण्याची खरी गरज आहे ते दिव्यांग,निराधार आणि जेष्ठ नागरिक यांच्यासाठी कुठल्याच अतिरिक्त निधीची तरतुद केली नसल्यामुळे तसेच याआधी वित्तमंत्री निर्मला सीतारमन यानींच प्रधानमंत्री गरीब कल्याण धन ...

मित्रत्व जपणारा, दोस्तीच्या दुनियेतील दिलदार राजा माणूस - सत्यजीत टिप्रेसवार

  नांदेड- उमरी (रे.स्टे) ग्रामीण भागात सर्व साधारण घरात जन्म झालेले व्यक्तीमत्व आणि ज्यांच्या नावात मध्येच सत्य जीत  म्हणजे  सत्यजीत टिप्रेसवार .... हे आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक या पदावर ग्रामीण रुग्णालय,भोकर येथे कार्यरत आहे . अत्यंत साधी राहणीमान...  कायम एक बॅग गळ्यात अडकलेली दिसणार. त्या बॅगेमध्ये डायरी,पाण्याची बाॅटल,टिफीन,काही मेडिसिन,फेव्हिकाॅल,काही महत्वाचे कागदपत्रे कायम राहणार.या बॅग मध्ये नाही असे काहीच नाही.प्रत्येक जण लाल व निळी पेन खिश्यात ठेवतात पण यांच्याकडे सर्व रंगाच्या पेन उपलब्ध असतात . कार्यालयात जर कुणी काळ्या रंगाची पेनची मागणी केली की, लगेच काढून देणार. म्हणजे थोडक्यात सत्यजीत यांच्याकडे नाही हा शब्दच नाहीच.यावरुनच सकारत्मक विचार बाळगणाराच नाही तर कधी कुणाचे जमत असेल तर चांगलेच काम करुन बाजूला होणार. हा स्वभावगुण असलेल्या या आमचा मित्राचा आज दि. १८ मे या दिवशी वाढदिवस आहे. या मित्राचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे. कारण सतत कुठल्या तरी कामात, कार्यात स्वत:हाला व्यस्त ठेवणार. यामुळे एक तर आयुष्यातला जो काही वेळ आहे तो वायफळ जात नाही. माणू...

नोंदणीची 27 मे अंतिम मुदत ; खरीप हंगामासाठी पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- खरीप हंगाम सन 2020-21 साठी पीक कर्ज घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी पुढील नमूद संकेतस्थळावर पीक कर्जाची मागणी नोंदणी ही 17 ते 27 मे 2020 या कालावधीत ऑनलाईन नोंदणीद्वारे करावी. शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. जागतिक महामारी कोवीड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सन2020-21 या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील पीक कर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी या संकेतस्थळावर https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSehk6tQ6VGKaSH_LSQ6o4u2S7dNATKcjwOK2mKLfD8qD7He0g/viewform?usp=sf_link  ऑनलाईन पीक कर्ज मागणी नोंदणी 17 ते 27 मे 2020 या दरम्यान करावी. ही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँक नांदेड मार्फत संबंधीत बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. ही यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. बँकेमार्फत लघुस...

रमजान ईद घरातच साजरी करा-शेख अलीसाहब बारुळकर

कंधार(प्रतिनिधी) मुस्लिम बांधवांचे  सण म्हणजे ईद उल फितर  हा आनंदाने साजरा करणारा सण आहे. एकमेकांमधे बंधुभावाचे नाते स्थापीत व्हावे आणि प्रेमाने आनंदाने साजरा होणारा असा हा उत्सव आहे. पण सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे, राज्यात व जिल्ह्यात कोरोनाह बधितांची संख्या वाढत आहे, त्यामुळे देशात लॉकडाउनचा कालावधी ही  वाढत आहे, मुस्लिम समुदायाचा पवित्र रमजान महिना या लॉकडाउन मध्येच आल्याने, रमजान ईद निमित्त मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात कपडे, नवीन वस्तु खरेदी करतात. त्यामुळे कंधार तालुक्यातील बारुळ येथील सामाजिक कार्यकर्ते शेख आलीसाहेब यांनी मुस्लिम समाजातील नागरिकांना आवाहन करत सांगितले की, सध्या देशात लॉकडाउन आहे, नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधितांचीसंख्या वाढत आहे, त्यासाठी  मुस्लिम समुदाय खरेदीसाठी कुठेही बाहेर पडुनये, रमजान ईद आपल्या घरीच साजरी करावी, मुस्लिम बांधव ईदगाह वा मशिदीत नमाज अदा न करता एकत्रीत येऊनये. एकमेकांना आलिंगन शुभेच्छा देऊनये. शासनाने ठरून दिलेले नियमाचे पालन करावे, ईद च्या दिवशी तळागाळातील व्यक्ती देखील या सणापासुन वंचीत ...

माझे अंगण ,माझे आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा - पाडुरंग शिंदे

रयत क्रांती संघटना वतीने 15 मे रोजी आंदोलन   कोरोना व्हायरसच्या महामारी ने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन सरकारने जाहीर केले. या काळात सर्वात जास्त नुकसान जगाचा पोशिंदा असणारा शेतकऱ्यांचे झाले आहे,पण सरकार शेतकऱ्याकडे या काळात लक्ष देत नाही, सरकारला वाटते कोरोणा हे एकमेव संकट आहे बाकी राज्यांमध्ये आता दुसरे कोणतेही संकट नाही,अशा पद्धतीने सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सरकारचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी  रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ. सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात माझे अंगण माझे आंदोलन दि.१५ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर शेतकरीपुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केले आहे.    हे आंदोलन आपल्या अंगणात, शेतात हातात आपल्या मागण्या चे पोस्टर घेऊन, लॉक डाऊनलोड सर्व नियम पाळून करावे. तोंडावर मास्क, शारीरिक आंतर ठेवून आंदोलन करावे. खालील मागण्या: - रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून राज्यभर हे आंदोलन करण्यात ये...

गंगाबेट परिसरात वादळी वाऱ्या मुळे केळी झाली भुईसपाट

⏩आमदार मोहन आण्णा हंबर्डे यांच्याकडून पाहणी शिराढोण :- (शुभम डांगे) नांदेड तालुक्यातील गंगाबेट येथील केळी उत्पादक शेतकरी शिवाजी सोनटक्के यांच्या शेतातील केळी वादळी वाऱ्यात भुईसपाट झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाजी सोनटक्के यांनी दुष्काळावर मात करून केळीचे पिक जोमात आणले होते. केळीच्या झाडांना चांगले फळही लागले होते. त्याची विक्री दहा ते पंधरा दिवसांत करण्यात येणार होती परंतु सरकारने घोषित केलेल्या लॉकडाउन मुळे सर्वत्र अडचण निर्माण झाली यातच रविवारी सकाळी पहाटेच्या सुमारास  वादळी वाऱ्यात 5 एकर क्षेत्रातील 3000 केळीची झाडे भूईसपाट झाली आहेत. गंगाबेट  परिसरासह  काही भागात रविवारी सकाळी मेघगर्जनेसह पाऊस व वादळी वारे झाले. यात गंगाबेट येथील शेतकरी शिवाजी सोनटक्के  यांच्या शेतातील केळीची पाच एकर बाग भुईसपाट झाली.आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या केळी उत्पादकांना रविवारी  पहाटे झालेल्या वादळ व पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. नांदेड  तालुक्यातील गंगाबेट  गावांतील केळी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.थंडी, उष्णतामान आणि पाणी कमी...

वर्तमान पत्रात दिव्यांगांबाबत वारंवार प्रकाशीत होत असलेल्या बातम्यांना हि बगल देत लोकशाही धोक्यात आणनार्या अधिकार्यांना दाखविणार अंध काठि आणि कुबड्यांचा हिसका :- राहुल साळवे

लाँकडाऊन संपताच प्रशासना विरूद्ध दिव्यांगांचा  आंदोलन :- राहुल साळवे.अध्यक्ष बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड नांदेड जिल्हा प्रतिनिधी दि 7 :-लाँकडाऊन संचारबंदीचा सध्या तिसरा टप्पा सुरू झालेला आहे तसेच जवळजवळ 47 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात (लाँकडाऊन) संचारबदी लागु आहे या (लाँकडाऊन) संचारबंदीचा सर्वाधिक फटका निसर्गताच जन्मता अपंगत्व प्राप्त बेरोजगार दिव्यांगांवर झालेला आहे एकतर डोळ्याला दृष्टि नको तसेच हाता पायाने अपंगत्व असल्यामुळे धड चालता हि येता येत नको असे दिव्यांग बरे (लाँकडाऊन) संचारबंदीमध्ये कुठे जावावे आणि कुणाला न्याय मागावे एरवी दिवसभरच घरात पडुन असणाऱ्या बेरोजगार दिव्यांगांवर या लाँकडाऊनचा फायदा तरी किती आणि नुकसान तरी किती हे सुदृढ व्यक्तींसह प्रशासकिय अधिकारी आणि लोकप्रतिनींधिंना कसे कळणार एरवी निवडणुकी दरम्यान गावोगावी जाऊन माय बाप बंधु भगीनी म्हणत मत मागणारे अशा संकट काळात दिव्यांगांचे फोन ऊचलायला तयार नाहीत त्यांना वाटत माझ्या मतदारसंघात राहुन राहुन असे किती दिव्यांग असतील बोटावर संख्या मोजण्या ईतके यांच्या मतदानाने मला नेमका काय फायदा होण...

अतिवृष्टी चे अनुदान शेतकर्‍याच्या खात्यावर त्वरित जमा करा - भाजपचे श्रीनिवास पा. नरवाडे याची मागणी

बिलोली (ता.प्र) तालुक्यातील सगरोळीसह आठ गावातील 3661 शेतक-याचे माहे अक्टोंबर व नोहेंम्बर 2019 अतिवृष्टी अनुदान 2 कोटी 8 लाख 99 हजार 368 रुपये त्वरित जमा करण्यात यावी असे निवेदन व्हाॅससअॅप द्वारे  देण्यात आले., सविस्तर माहीती अशी की बिलोली तालुक्यात 2019 अक्टोंबर नोहेंम्बर मध्ये अतिवृष्टी झाली होती यात अनेक शेतक-याचे पिकांचे नुकसान झाले होते यामुळे या नुकसानीचे फंचनामे करून शासनाकडुन आर्थिक मदत जाहिर करण्यात आली होती ही मदत बिलोली तालुक्यात चार टप्यात वर्ग करण्यात आली पहील्या टप्यात 21 गावातील 10872 शेतक-याना 6 कोटी 37 लाख 89 हजार 354 रुपये देण्यात आले तर दुस-या टप्यात 57 गावातील 25 हजार 226 शेतक-याना 13 कोटी 93 लाख 90 हजार 499 रूपये देण्यात आले तसेच तिस-या टप्यात आठ गावातील 5666 शेतक-याना 3 कोटी 59 लाख 94 हज़ार 674 रूपये अतिवृष्टी अनुदान जमा करण्यात आले त्यातील ब-याचे गावातील शेतकर-यानी अतिवृष्टी अनुदान उच्चल केली आहे  पण चौथ्या टप्यातील सगरोळी,शिंपाळा,टाकळी,खुर्द टाकळी थंडी तळणी,थडीसावळी,तोरण,वलीयाबाद,येसगी,या 9 गावातील 3631 शेतकरी बांधवांची 2 कोटी 8 लाख 99 हज़ार 368 ...

बिलोली तालूक्यातील अतिवृष्टीचे अनुदान शेतकरी यांच्या खात्यावर त्वरित जमा करा -मनसे शंकर महाजन

बिलोली तालुक्यातील सगरोळीसह आठ गावातील 3661 शेतक-याचे माहे अक्टोंबर व नोहेंम्बर 2019 अतिवृष्टी अनुदान 2 कोटी 8 लाख 99 हजार 368 रुपये त्वरित जमा करण्यात यावी आसे निवेदन मुख्यमंत्री याना ईमेल द्वारा मनसे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यानी दीले सविस्तर माहीती अशी की बिलोली तालुक्यात 2019 अक्टोंबर नोहेंम्बर मध्ये अतिवृष्टी झाली होती यात अनेक शेतक-याचे पिकांचे नुकसान झाले होते यामुळे या नुकसानीचे फंचनामे करून शासनाकडुन आर्थिक मदत जाहिर करण्यात आली होती ही मदत बिलोली तालुक्यात चार टप्यात वर्ग करण्यात आली पहील्या टप्यात 21 गावातील 10872 शेतक-याना 6 कोटी 37 लाख 89 हजार 354 रुपये देण्यात आले तर दुस-या टप्यात 57 गावातील 25 हजार 226 शेतक-याना 13 कोटी 93 लाख 90 हजार 499 रूपये देण्यात आले तसेच तिस-या टप्यात आठ गावातील 5666 शेतक-याना 3 कोटी 59 लाख 94 हज़ार 674 रूपये अतिवृष्टी अनुदान जमा करण्यात आले त्यातील ब-याचे गावातील शेतकर-यानी अतिवृष्टी अनुदान उच्चल केली आहे  पण चौथ्या टप्यातील सगरोळी,शिंपाळा,टाकळी,खुर्द टाकळी थंडी तळणी,थडीसावळी,तोरण,वलीयाबाद,येसगी,या 9 गावातील 3631 शेतकरी बांधवांची 2 क...

बिलोली नगर परिषदेच्या वतीने धर्मल गनने तपासणी सुरु

बिलोली -  कोरोना विषाणूचा   प्रादुर्भाव रोकण्यासाठी बिलोली लोली नगर परिषदेचे . नगराध्यक्षा सौ.मैथिलीताई संतोष कुलकर्णी, उपाध्यक्ष मारोती पटाईत, यांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डाॅ.नागेश लखमावार यांच्या हस्ते थरमल गन मशीन ला  प्रभाग नं. 1 पासुन सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना महाभयंकर विषाणु जगभरात थैमान घातलेला असुन बिलोली शहरातील प्रत्येक घरोघरी जाऊन, नागरीकाची थरमल गन मशीनद्वारे चाचणी करण्यात येणार आहे .याचे नियोजन नगरसेवक जावेद कुरेशी. नगरसेविका प्रतिनिधी नितीन देशमुख नगरसेविका प्रतिनिधी अमजद चाऊस.न.प.कर्मचारी गणेश फालके,लईख सिददीखी,रुग्णालयाचे कर्मचारी तोटावार कुंङलवाङीकर, शेख खमर आदी करीत आहेत ------------------------------------ बिलोली शहारात कोरोना विषाणू चा रोकण्यासाठी  प्रभाग 1 पासून धर्मल गनने नागरिकांची तपासनी होणार असून नागरिकांनी सहकार्य करावे - नगर सेवक जावेद कुरेशी

आरळी येथे शंभर गरजु लोकांना धान्य किटाचे वाटप

बिलोली -आरळी येथे गरजू  100 लोकांना  धान्याचे किट देण्यात आलेल्या त्यामध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, तेल, साबण ,साखर,  मास्क अदि  श्री विक्रमादित्य  कि.मांडे जिल्हा व अति सत्र न्यायाधीश बिलोली  श्री . नीलेश सु. बुद्रुक दिवाणी न्यायाधीश व स्तर बिलोली , यांच्या वतीने  व साईबाबा ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, माजी न.प.अध्यक्ष विजय कुचंनवार, माजी.न.प.उपाध्याक्ष शंकर मावलगे , साई मंदिर ट्रस्ट चे किरण  देशमुख ,अलकाताई देशमुख, किशन पटाईत , अरळी येथील  माजी सरपंच  हज्जपा पाटिल , माजी उपसभापती दत्ताराम बोधने ,अब्बाराव संगनोर, रमेश पाटील बोडके, ओम घोडके, बालाजी नरहरे, दत्ता रोडे ,प्रभुनाथ देशमुख अदि उपस्थित होते.

माजी नगर उपाध्यक्ष तथा नगर सेवक अनुपदादा अंकुशकर यांच्या पुढाकारातुन होणार बिलोली शहरातील प्रभाग 8 मधिल 2000 हजार नागरिकांची धर्मल गनने तपासणी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बिलोली नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष तथा नगर सेवक  अनुपदादा अंकुशकर यांनी स्वखर्चाने बिलोली शहरातील गांधीनगर प्रभाग 8 मधील सर्व नागकांची 3  थर्मल स्क्रिनिंग गन द्वारे आज पासून तपासनीला सुरवात झाली आहे प्रभाग 8 मधील नागरिंकांची गनद्वारे तपासनी होणार आहे. आज धर्मल गन   द्वारे नागरिकांची तपासनी  बिलोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक नागेश लखमावार व  नगर सेवक अनुपदादा अंकुशकर यांच्या उपस्थित सुरवात करण्यात आली या वेळी अँड.नागेश येरावार,राजु गंदेवाड,अँड मनोज अरळीकर .राचेवाड सर,प्रदिप कुंचेलीकर,जेनगावकर,संतोष चिकनेकर,साखरे पाटील,डॉ गेंदेवाड,बिट्टू खांडेकर,मारोती बोडके,मुकिर भाई ,मनिलाल मेहता अदी धर्मल गनद्वारे तपासनी करण्यात आली..

प्रा.डॉ.जीवन चव्हाण यांची मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड

 नायगाव येथील सामाजिक राजकीय क्षेत्रातील उच्च शिक्षित युवा नेतृत्व प्रा.डॉ.जीवन पा.चव्हाण यांची मराठा सेवा संघ नायगांव तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष शामसुंदर शिंदे नायगांवकर यांनी पत्राद्वारे कळविले.आहे. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे .     प्रा.जीवन चव्हाण हे एक उच्चशिक्षित अभ्यासु व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण तालुक्याला परिचित आहेत. विद्यार्थी दशेपासून सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात चळवळीच्या माध्यमातून घडत गेलेले ते एक व्यक्ति आहेत..   मागच्या दहा वर्षात त्यानी राजकीय क्षेञाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. वेगवेगळे आंदोलनात सहभागी होऊन जनतेच्या समस्या शासन दरबारी हिरीरीने मांडल्या आहेत. विद्यार्थी, शेतकरी, सामान्य जनता यांच्या प्रश्नावर ते नेहमी अभ्यासुपणे कणखरपणे विचार मांडत असतात. याशिवाय ते प्रसिद्ध वक्ते म्हणून परिचित आहेत...या सर्व बाबीचा विचार करुन प्रा.जीवन चव्हाण या तरुण अभ्यासू, वैचारिक व्यक्तिमत्वाची जाण असणारे म्हणून तालुकाध्यक्ष पदाची जवाबदारी जिल्हाध्यक्ष शामसुंदर शिंदे नायगांव...

इंद्रजीत तुडमे यांच्या वाढदिवसा निमित्त 211 कुटुंबांना धान्याची किट वाटप

सुनिल कदम . भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे तालूका अध्यक्ष इंद्रजीत यादवराव तुडमे  यांच्या वाढदिवसा निमित्त गंरजुना व दोन महीण्यापासून घरी बसुन राहानां-या  वरी उपासमारीची वेळ व जिवन जगने कठीन झाले  अशी  आवस्था जनतेवर आली  आहे  म्हणून    काम केले तरच चुल पेटतो अश्या ना पोट  भरण्यासाठी दरोज काम करावे लागतो  तरच चुल पेटतो म्हणून  जनतेला आव्हान केले आहे. लाखडाऊन च्या काळात घरातच राहुन सहकार्य करुन कोरोणाला दोन हात करण्या शक्ती  बाळगून आपण थोंड द्यावे .असे जनतेला  घाबूरुनये  व गरजुंना खाण्याची  व्यवस्था  कुंटुंबाना  धान्याची किट   वाटप केले  आहे.     गोर गरिबांना त्यांना जेवणाच्या व दैनंदिन  विविध लागणाऱ्या   महत्त्वाचे गरजा  दैनंदिन आवश्यक खाण्याचे व कपड्याचे साबण व अंगाचे साबणा व खाण्याचे रार्शन कुंटुंबांना इंद्रजीत तुडमे यांच्या वाढदिवसा निमित्ताने  देण्यात आले.  तुडमे यांनी  यावेळी वाढदिवसा निमित्त जनतेला आव्हान केले.विणाकारण  ...

भारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेची रक्कम तत्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करा-संविधान दुगाने

जिल्हाधिकारी व समाजकल्याण आयुक्ताला इंडियन पँथर सेनेचे ऑनलाइन निवेदन सादर मुखेड प्रतिनिधी/भारत सोनकांबळे शैक्षणिक वर्ष २०१९-२० हे संपत आले तरी अद्यापही नांदेड जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेपासून शिष्यवृत्ती व समाज कल्याण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत.या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन इंडियन पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष संविधान दुगाने यांनी नांदेडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि समाज कल्याण उप आयुक्तांना लॉकडाऊनमुळे ऑनलाइन मेलद्वारे निवेदन सादर करून येत्या आठवडाभरात शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची मागणी केली आहे.            एकीकडे देशावरील वाढत्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ग्रामीण भागातील शिक्षणानिमित्त शहरी भागात राहायला आलेल्या विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.बरेच पात्र विद्यार्थी हे  शेतकरी,मजुरदार व गरीब कुटुंबातील आहेत.त्यांची आर्थिक परिस्थिती लॉकडाऊनमुळे अत्यंत हालाकीची झाल...

कोरेनाच्या महामारीत ग्रामीण भागात पूर्णपणे सामाजिक बांधिलकी जोपासत डाॅ फारुख शेख देत आहेत रुग्णसेवा...

मुखेड प्रतिनिधी/भारत सोनकांबळे सद्यस्थितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना या महाभयंकर महामारिने थैमान घातले असून गेली महिनाभरापासून देशासह संपूर्ण राज्यात लॉक डाऊन चालू आहे. जगात सगळीकडे कोरेणा विषाणु प्रभावाने महामारी माजली असून ह्या विषाणु मुळे देशासह संपूर्ण राज्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून त्यामुळे विविध विभागातून मिळणार्या भारताला हजारो करोड च्या महसुलाकडे न बघता प्रत्येक भारतीयांची प्राणाची रक्षा करण्यासाठी भारताचे प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांनी टाळेबंदी ची घोषणा करत नागरिकांनी घरातच राहून कोरो ना महामारिवर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते तर आरोग्य विभाग पोलिस प्रशासन यंत्रणा,महसुल विभाग ने दिवसराञ मेहनत घेत कोरेणा विषाणु ला संपुष्टात आणण्यासाठी उपाययोजना म्हणून सर्वतोपरी काम करत आहेत. कोरेणा विषाणु च्या लागणीमुळे अनेक डॉक्टर, पोलीस अधिकारी कर्मचारी,सामाजिक कार्यकर्त्यांना या कोरोना संसर्गजन्य रोगामुळे अनेक खाजगी डॉक्टरांनी आपली दवाखाने बंद केले असल्याचे दिसते तर काहींनी दुरूनच रुग्णाला विचारपूस करून उपचार करण्याची पद्धत अवलंब...

शहरातील वाढती रूग्न संख्या पाहता एकमेकांवर ताषेरे ओढण्यापेक्षा आतातरी एकजुटीने लढा ऊभारला पाहिजे - राहुल साळवे

जिल्हा प्रतिनिधी दि 3 में :- कोरोना या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात गत दिड महिण्यापासुन अहोरात्र जीवाची बाजी करत स्वताचा जीव धोक्यात घालून पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग, महसूल विभाग, महानगरपालिका यासह ईतर ते सर्व प्रशासकिय विभाग आणि दररोजचे अपडेट देणारे ते सर्व पत्रकार आणि टिव्हि चँनल प्रतिनीधी ज्यांनी जवळपास एक महिना जिल्ह्यात एकहि कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण मिळणार नाही याची काटेकोरपणे खबरदारी घेत ऊल्लेखनीय कामगीरी बजावली परंतु पिरबुर्हान नगर येथील पहिल्या पाँझिटिव्ह रूग्नांने जिल्हा प्रशासनासह नांदेड वासियांची देखील धडधड वाढवली नंतर परत एक अफचलनगर येथील पाँझिटिव्ह रुग्ण सापडला त्यानंतर सेलु येथील महिलेचा रिपोर्ट हि पाँझिटिव्ह येत आकडा तीनवर झाला होता त्यापैकि पिरबुर्हाण नगर येथील पहिल्या रूग्नाचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला परंतु त्यांचा मृत्यु झाला आणि त्याच दिवशी रात्री सेलु येथील महिलेचा हि मृत्यु झाला त्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यभरात विविध अफवा पसरवली गेली.याच दरम्यान लाँकडाऊनमुळे पंजाब येथील शेकडो यात्रेकरी नांदेड येथे गुरूद्वारा दर्शनासाठी आले असता त्यां...

बिलोली तालुक्यातील शेतक-यांच्या त्या अतिवृष्टी प्रलंबित अनुदानास जबाबदार कोण?

बिलोली गेल्या सप्टेंबर/आँक्टोंबर महीण्यात तालुक्यात  झालेल्या अतिवृष्टीतील खरीप पिक नुकसानग्रस्त  बाधित शेतक-यांना  शासनाकडुन  जाहिर करण्यात आलेली  तातडीची अनुदानित आर्थिक  मदत सहा महीण्याचा प्रतिक्षेचा कालावधी  उलटुन गेला तरी अद्यापही शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने आणि त्या मागणीची रक्कम शासन स्थरावरच प्रलंबित आसल्याने त्या वंचित  शेतक-यांवर अन्याय का ? त्या प्रलंबित अनुदानास  जबाबदार कोण ? या विषयी  संतप्त जनक प्रतिक्रिया तालुक्यातील शेतकरी वर्गातुन उमटत आहे. राज्यात गेल्या सप्टेंबर/आँक्टोंबर महिण्यात  झालेल्या अतिवृष्टीमध्ये खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या नुकसानग्रस्त बाधित शेतक-यांना तातडीची आर्थिक मदत म्हणुन प्रति हेक्टरी आठ हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टर मर्यादे नुसार शासनाकडुन अनुदान जाहीर करण्यात आले.माञ तालुक्यातील या सर्वेक्षणात काही तलाठी व कृषिसहायकांनी ठराविक गावचे चुकीचे सर्वे अव्हाल शासनाकडे  सादर करुन शेतक-यांवर अन्याय  केल्याने   या अन्यायाच्या विरोधात अखिल...

आज आरोग्य वर्धिनी केंद्र मुगट येथे फेस शिल्डचे वाटप

आज २० कर्मचऱ्यांसाठी होते, पण सर्व कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे..एकूण ८७ यात अधिकरी 3, कर्मचारी 39, आशा 34 आदी वेळ कर्मचऱ्यां 8 अशा सर्वांना वाटप करण्यात येणार आहे.  डॉ.संजय कासरालीकर वैद्यकीय अधिकारी, डॉ. गिरीश मुंदडा,जसराज मुंदडा,डॉ.गोवंदे,डॉ. वैशाली कस्तुरे,डॉ. काळे, डॉ. खान मॅडम, साळवे, रणविरकर, भारती, राठोड,जोंधळे, खैसर, श्रीमती.टीप्रसे, कुरुडे,जाधव, मेहतर,, गाडेकर हे उपस्थित होते.